प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
• प्रस्तावना -
• प्रसुती झाल्यानंतर ही आराम किंवा विश्रांती करण्याची गरज असते तेव्हा सुद्धा आर्थिक स्थती
कमकुवत असल्या कारणाने तसेच कुटुंबाला हातभार लागावा या उद्देशाने त्यांना मोल मजुरीचे काम करावे लागते .
• परिणाम स्वरूप गर्भवती माता कुपोषित राहतात व जन्माला येणारे बालक सुद्धा कमी वजन व कुपोषणाचे शिकार बनते . माता व नवजात बालक यांचा ' मृत्यू होवू शकतो . हे प्रमाण वरचेवर वाढतच आहे .
• माता व बालक मृत्यूची बाब विचारात घेवून भारत pसरकारने महीला व बालविकास मंत्रालयामार्फत पूर्ण देशात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरूवात केली .
• प्रधानमंत्री मातृ वंदना योजना •
------------------------------------------------
• सुरुवात - 2017 पासून
• व्याप्ती - संपूर्ण भारतभर
• मार्फत - महिला व बालविकास विभाग भारत सरकार
• उद्देश - गरोदर माता, नवजात बालक, स्तनदा माता यांना सकस ,संतुलीत, पोषक आहार देवून यांचे आरोग्य सुधारणे आणि माता व बालक मृत्यू दर कमी करणे .
• खर्च सहभाग हिस्सा -केंद्र शासन व राज्य शासन यांचा या योजनेवरील खर्च सहभाग अनुकमे 60% व 40% निश्चित केलेला आहे .
• लाभ केव्हा व कसा -
1) पहिल्या अपत्यासाठी लाभ -
या योजनेत पहिल्या प्रसुतीसाठी किंवा बाळासाठी तीन हप्त्यात / टप्प्यात पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो .
टप्पा क्र 1 . - शेवटच्या मासीक पाळीच्या दिवसापासून
150 दिवसात गर्भधारणेची नोंद केल्यास 1 हजार रुपये.
टप्पा क्र . 2 . - गर्भधारणा झाल्यानंतर सहा महिन्यांनी 2 हजार रुपये .
टप्पा क्र . 3 - बाळंतपणानंतर बाळाची नोंदणी तसेच पहिल्या लसीकरणाच्या नंतर 2 हजार रुपये .
2) दुसऱ्या अपत्यासाठी लाभ -
या योजनेत दुसऱ्या प्रसुतीसाठी किंवा बाळासाठी एकरकमी 6 हजार रुपयाचा लाभ दिला जातो . मात्र दुसऱ्या बाळासाठी लाभ घेण्यास अटी आहेत .
-दुसरे अपत्य हे मुलगी असायला हवे तरच मुलीच्या जन्मानंतर एकत्रीत एकरकमी 6 हजार रुपयाचा लाभ दिला जातो
- यासाठी जन्म दाखला आवश्यक आहे .
- तसेच बालकाचे 14 आठवड्यापर्यंत चे लसीकरण पूर्ण झालेले हवे .
मानवी शरीराच्या महत्त्वपूर्ण बाबी - पंचतत्व , पंचप्राण, पंचकोश पहा लिंक मध्ये..
Comments
Post a Comment