मानवी शरीराच्या महत्त्वपूर्ण बाबी -पंचतत्व, पंचप्राण आणि पंचकोश .
_________________________________________
• मानवी शरीर हे पुढील तीन बाबींपासून बनलेले आहे.
अ) पंचतत्व,
आ) पंचप्राण आणि
इ)पंचकोश
अ) पंचतत्व-
पंचतत्वात पाच पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
1.अग्नी 2.वायू 3.आकाश 4.पृथ्वी 5.जल
1) अग्नी - नेत्र व जठराग्नी मध्ये अंतर्भाव
2)वायू - त्वचा मध्ये अंतर्भाव
3)आकाश - कान, मुख ,कंठ आणि शरीरातील पोकळ अवयव मध्ये अंतर्भाव.
4)पृथ्वी- नाक आणि शरीराचा आकार मध्ये अंतर्भाव.
5)जल - जीभ, कफ ,मेद ,रक्त ,मांस आणि शुक्र इत्यादीमध्ये अंतर्भाव
• शरीरातील सप्तधातू
मानवी शरिरामध्ये पुढील सात धातूंचा अंतर्भाव असतो.
1) रस 2) रक्त 3) मांस 4 ) मेद 5) अस्थी 6) मज्जा 7) वीर्य
•शरीरातील सात मल
शरीरातील सप्त धातूपासून सात प्रकारचे मल तयार होतात.
1) रसाचा मल- जीभ ,डोळे , गाल यापासून जो मल निघतो यास रसाचा मल म्हणतात.
2) रक्ताचा मल - पित्त, कफ यापासून मल निघतो यास रक्ताचा मल म्हणतात
3) मांस धातूचा मल - कानापसून मल निघतो यास मांस धातूचा मल म्हणतात
4) मेदाचा मल - दात आणि लिंगेंद्रियापासून मल निघतो यास मेदाचा मल म्हणतात .
5) अस्थीचा मल - हात आणि पायाची नखे यापासून मल निघतो यास अस्थी चा मल म्हणतात .
6) मज्जाचा मल - डोळ्यातील घान यास मज्जाचा मल म्हणतात .
7) विर्याचा मल - तोंडावरील पिंपल्स व तेलकटपणा यास विर्याचा मल म्हणतात.
• शरीरातील त्रिदोष -
शरीरात तीन प्रकारचे दोष असतात ते पुढीप्रमाणे-
1) वात 2) पित्त 3) कफ
या तीन दोषापैकी वात हा महत्वपूर्ण दोष आहे . कारण पित्त व कप हे दोष क्षीण आहेत . तसेच ते त्यांच्या स्थानापासून वाताशिवाय हलू शकत नाहीत . वातच त्यांना इकडेतिकडे घेऊन जाऊ शकतो . म्हणून वात (वायू ) पित्त व कफ यामध्ये चंचल तसेच बलवान आहे. तो संपूर्ण शरिरात व्याप्त आहे म्हणूनच त्याला शरिराचा प्राण म्हणतात . गीता व उपनिषेदात प्राणालाच ब्रम्हा अशी विशेष उपमा दिली आहे .
आ)शरिरातील पंचप्राण-
शरीरात पुढील पाच प्रकारचे पंचप्राण असतात.
1)प्राण 2) अपान 3)उदान 4)समान 5)व्यान
1) प्राण - कंठापासून हृदयापर्यंत च्या भागातील प्राण
2)अपान - बेंबीपासून पायाच्या बोटापर्यंतच्या भागातील प्राण
3)उदान - कंठापासून डोक्या पर्यंतच्या भागातील प्राण
4)समान - हृदयाच्या खालच्या भागापासून बेंबी पर्यंतच्या भागातील प्राण
5)व्यान - सर्व शरिरातील प्राण
• शरिरातील पाच उपप्राण -
शरीरात पुढील पाच प्रकारचे उपप्राण असतात.
1) देवदत्त 2) नाग 3) कृंकल 4) कूर्म 5) धनंजय
1)देवदत्त - यामुळे जांभई व थुंकी येते.
2) नाग - यामुळे उचकी व ढेकर येतो
3) कृंकल - यामुळे शिंक येते व भूक लागते .
4)कूर्म - पापण्यांची उघडझाप होते .
5)धनंजय - यामुळे सर्व अंगावर खाज येते व हाताला व पायाला मुंग्या येतात .
इ) शरिरातील पंचकोश -
शरीरात पुढील पाच प्रकारचे पंचकोश असतात.
1)अन्नमय कोश 2)प्राणमय कोश 3)मनोमय कोश
4)विज्ञानमय कोश 5)आनंदमय कोश
1)अन्नमय कोश - पंचधातूपासून बनलेल्या हाडामासाच्या स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात . प्राणायामाने अन्न कोशाची शुद्धी होवून शरिर स्वस्थ व निरोगी राहते .
2) प्राणमय कोश - श्वासोच्छासाच्या रूपाने प्राण किंवा ऑक्सीजन आत - बाहेर जाण्याची क्रिया ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास प्राणमय कोश म्हणतात .
प्राणायामा ने प्राणमय कोशाची कार्यक्षमता वाढते
3)मनोमय कोश - प्राणमय कोशाच्या आत मनोमय कोश असतो . कान डोळे त्वाचा नाक व जीभ ही पाच ज्ञानेद्रीये आणि सहावे मन अशा सहा तत्वाचा मिळून मनोमय कोश होतो .
4)विज्ञानमय कोश - मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश असतो . सुक्ष्म शरिरातील दुसरा भाग ज्यात तर्क विचार करण्याची क्रिया घडून येते त्या भागास विज्ञानमय कोश असे म्हणतात . यामध्ये ज्ञानेंदिये व बुद्धीचा समावेश होतो . या कोशाच्या जागृती मुळे विचार शक्तीचा विकास होतो . लोभ मत्सर आसक्ती असत्य भ्रम इत्यादी दोषा पासून मनाचे रक्षण होते .
5) आनंदमय कोश -आनंदाकार आंतर्मुख वृत्तीलाच आनंदमय कोश म्हणतात . हृदयामध्ये स्थित या कोशाचा संबंध अंतरीक ज्ञानाशी असतो.
• सुख प्राप्तीसाठी अष्टांग मार्ग -
सुख प्राप्तीसाठी अष्टांग मार्ग पुढीप्रमाणे आहेत.
1)यम 2)नियम 3)आसन 4)प्राणायाम 5)प्रत्याहार 6)धारणा 7)ध्यान आणि 8)समाधी
आता होणार गायी - म्हशी यांचे 50%अनुदानावर वाटप तसेच बरेच काही अनुदान पहा लिंक

Comments
Post a Comment