ई -पीक पाहणी 2025
■ ई‑पीक पाहणी :-
■ ई- पीक पाहणी म्हणजे शेतकर्यांनी स्वतः च्या शेतात कोणते पीक घेतले आहे याची नोंद स्वतःच सातबारावर नोंदविणे होय.
■ शेतीची तसेच पिकांची माहिती डिजिटल रुपात गोळा करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम राबविला जातो.
■ ई‑पीक पाहणीतून पीक पद्धती, पिकांची अवस्था, शेतीचे क्षेत्रफळ, आणि पिकांसंबंधित माहिती पोर्टलवर भरली जावून शेतकर्यांना कृषी योजना, अनुदान देणे याकामी शासनास उपयोगी ठरते.
■ महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत ई‑पीक पाहणी कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत .
■ तर रबी हंगामासाठी ई पीक पाहणी ही संन 2024 पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू केली आहे.
■ सन 2025 चा खरीप हंगाम :-
ई ‑पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून सातबारा उताऱ्यावर शेतात लागवड केलेली असलेल्या खरीप पिकांची नोंदणी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून करायची आहे.
■ नवीन अपडेट :-
खरीप हंगामातील ई‑पीक पाहणीची कार्यवाही दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू आहे.
या 2025 च्या खरीप हंगामासाठी ई‑पीक पाहणी DCS मोबाईल अॅॅप हा 4.0.0 स्वरूपातील सुधारित स्वरुपात उपलब्ध आहे.
■ ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत:-
दिनांक 1ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान शेतकऱ्यांनी स्वत: पीक पाहणी करावी.
■ महसूल कर्मचारी:-
जर काही कारणास्तव शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी न केल्यास, महसूल कर्मचारी दिनांक 15 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या काळात गावनिहाय सर्वेक्षण करतील.
■ई पीक पाहणी करण्यासाठी लागणारी माहिती:-
1. सातबारा उतारा (7/12 extract)
2. पिकाचे नाव आणि प्रकार
3. पेरणीची तारीख
4. क्षेत्रफळ (हे. / गुंठे)
5. फोटो अपलोड करणे आवश्यक आहे
■अॅपद्वारे प्रक्रिया:-
1. "ई पीक पाहणी" अॅप Play Store वरून घेणे.
2. स्वतः च्या मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करा.
3. गाव, गट नंबर, शिवार निवडा.
4. शेतातील पिकाची माहिती भरा.
5. फोटो अपलोड करा
6. सबमिट करा
जुगार खेळाचा विळखा पहा लिंक -
Comments
Post a Comment