ऑनलाईन जुगारू खेळ आणि कर्जबाजारी झालेला युवा वर्ग




 भारतामध्ये आज जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे म्हणून भारताला जगातील सर्वात तरुण देश म्हटले जाते.

 आज सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळे व जगातील माहिती अल्पावधी मिळत असल्यामुळे तरुण वर्ग खूपच आधुनिक बनला आहे.

या स्मार्टफोन वापरनाऱ्या तरुण वर्गाला विविध ऑनलाइन खेळातून पैसे कमावून देण्याचे आमिष  दाखवले जाते.

 तरुण वर्गालाही कमी कष्टामध्ये पैसे मिळतील या आशेने हे योग्य वाटते व तो कमी कष्टामध्ये मेहनत न करता भरपूर पैसे कमावण्याच्या हेतूने  ऑनलाइन खेळाच्या आहारी  जातो.

इंटरनेट वापरणारा बहुतांशी तरुण वर्ग ऑनलाइन खेळ खेळण्यात व्यस्त असतो. विविध संशोधन अहवालानुसार ऑनलाइन खेळ खेळणाऱ्याची संख्या भारतामध्ये काही कोटीमध्ये आहे.

शहरातील युवर वर्गापेक्षा ग्रामीण भागातील युवा वर्ग या ऑनलाइन खेळांच्या जास्त आहारी गेलेला दिसून येतो. जवळ असलेली जमापुंजी या ऑनलाइन खेळामध्ये खर्च करतो परिणामी जवळ असलेली मालमत्ता याच ऑनलाइन खेळापायी  विकून तो कर्जबाजारी बनतो. 

ऑनलाईन खेळाचा ग्रामीण भागात वाढता प्रभाव आणि ऑनलाइन खेळाचे युवा वर्गाला लागलेले व्यसन यातून आलेला  कर्जबाजारी पुढे या युवा वर्गाच्या आत्महत्येचे कारण बनतो.

• देशातील ऑनलाइन खेळाचे प्रकार:-

भारतात आजमितीला सात प्रकारचे ऑनलाइन खेळ आहेत. यात खालील ऑनलाइन खेळ पैसे खर्च करून खेळले जातात.

1. रमी

2. पोकर

3. ड्रीम 11 

4. एम पी एल 

5. My11Circle 

6. Paytm First Games

7. WinZO Games

8. RummyCircle

9. DraftKings India 

10. Teen patti

11. Ludo

• जाहिरात करणारे दिग्गज:- 

   या ऑनलाइन खेळांची जाहिरात करणाऱ्या काही दिग्गजामध्ये सचिन तेंडुकरसह,  महेंद्रसिंह धोनी सुद्धा आहे. जाहिरात करणारे प्रसिद्ध व्यक्ती खालील प्रमाणे.

1. महेंद्रसिंह धोनी  – My11Circle 

2. सचिन तेंडुलकर  – Paytm First Games

3. विराट कोहली – MPL (Mobile Premier League)

4. सौरव गांगुली  – My11Circle

5. श्रद्धा कपूर  – Dream11

6. कार्तिक आर्यन  – WinZO Games

7. संजू सॅमसन – RummyCircle

8. रणवीर सिंग – DraftKings India 


• ऑनलाईन खेळांवर बंदी असणारे राज्य:- 

भारतातील काही राज्यांमध्ये ऑनलाईन जुगारू खेळावर बंदी घालण्यात आलेली आहे .त्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम,नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय , ओडिशा, तेलंगणा या आठ राज्यांचा समावेश आहे.


• फसवणुकीचे उदाहरण:-

पुण्यातील एका पुस्तक विक्रेत्याने या ऑनलाइन जुगारू खेळातून 69 लाख रुपये जिंकले पण या ऑनलाइन खेळाच्या जुगारू कंपनीने  45 लाख रुपये दिले नाहीत म्हणून त्याने सायबर सेल कडे गुन्हा नोंद केलेला आहे.


• ऑनलाइन जुगारू खेळासाठी घरात चोरी:-

पुणे जिल्ह्यातील औंध मधील एका 29 वर्षाच्या तरुणाने त्याच्याच घरातील 38 लाखाचे दागिने व रोकड ऑनलाइन जुगारू खेळण्यासाठी चोरून नेली .


•ऑनलाइन जुगारू खेळातून कर्जबाजारी झाल्याने आत्महत्याचे उदाहरण:-

धाराशिव जिल्ह्यातील  बावी या गावच्या श्री. लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने या ऑनलाइन जुगारू खेळासाठी कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी व दोन वर्षाच्या बाळाला वीस पाजून स्वतः सुद्धा आत्महत्या केली . 

•ऑनलाइन जुगारू खेळासाठी शेतीची विक्री केल्याचे उदाहरण:-

मावळ तालुक्यातील (पुणे जिल्ह्यातील) कुसगाव ग्रामपंचायत अतिशय श्रीमंत ग्रामपंचायत आहे. तेथील दोन तरुण या खेळात कर्जबाजारी झाले म्हणून त्यांनी स्वतःच्या शेतीची विक्री केली.

•आजची ताजी बातमी:-

   महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे पार पडले . अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी कृषिमंत्री  या नात्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे, सोडवणे व कायदे करणे संदर्भाने कामकाजात सहभाग घेण्याऐवजी ऑनलाइन जुगारू असणारा रमी हा खेळ खेळण्यास प्राधान्य दिले ,हे अतिशय निंदनीय आहे. या प्रकारामुळे पूर्ण राज्यांमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. 

  खरे पाहता या ऑनलाइन जुगारी खेळावर बंदी आणणाऱ्या आठ राज्याचे खूप खूप अभिनंदन .

परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विधिमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे, याच कायदे मंडळातील सदस्यांमध्येच ऑनलाइन जुगारू खेळ असणारा  रमी हा खेळ खेळणारे सदस्य असतील तर आपल्या राज्यामध्ये ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची आपण अपेक्षा करणे योग्य नाही.

आता भारतात आणला जाणार आफ्रिकन चित्ता... पहा लिंक.

https://informationsupport11.blogspot.com/2025/07/blog-post_20.html

मटकी खा, हृदय रोग टाळा......पहा लिंक.

https://informationsupport11.blogspot.com/2025/07/blog-post_22.html




Comments