मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक.


          


      

• मुख्याध्यापक •


•  महाराष्ट्र राज्यातील शाळेमध्ये 1 ली ते 5 वी, 1 ली ते 10 वी 8 वी ते 10 वी आणि 8 वी ते 12 वी  मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यता निकषात बदल केला गेला आहे.

•  नव्या संचमान्यतेनुसार शाळेत मुख्याध्यापक पद मान्य होण्याकरिता एकूण 100 विद्यार्थी असले पाहिजेत व पूर्वीचे मंजूर पद टिकवायचे असल्यास 90 विद्यार्थी पट आवश्यक आहे ,असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च, 2024 रोजी  एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. मात्र त्याला विरोध झाला व त्यात बदल करावा लागला.त्यात पुढील मुद्द्यांचा समावेश केलेला होता.

1)  पद निश्चीतीच्या प्रचलित धोरणांमध्ये अधिकची सुस्पष्टता आणणे .

2) प्राथमिक , उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर शिक्षकांची पदे निश्चित करणे. 

3) मुख्याध्यापक पद निर्मितीसाठी 150 विद्यार्थी शाळेत असणे , निश्चित करण्यात आली होती.

मात्र या 15 मार्च,2024  च्या शासन निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून विरोध केला गेला .या शासन निर्णयात  सुधारणा करण्यात आली . ती पुढीप्रमाणे.

1) आता मुख्याध्यापक पद निर्मितीसाठी एकूण 100 विद्यार्थी पाहिजेत. तर पूर्वीच्याच मुख्याध्यापकाचे मंजूर पद संरक्षित करण्यासाठी  कमीतकमी विद्यार्थी संख्या 90 पाहिजे असा  निर्णय घेवून सुधारणा करण्यात आली.

 2) जर मुख्याध्यापकाचे  पद एखाद्या शाळेवर अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना समान व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करण्यात यावे.

3) समायोजन केल्यानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधीत मुख्याध्यापकांला ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत त्याच ठिकाणी ते निवृत्त होईपर्यंत किंवा  विद्यार्थी  पटात वाढ होईपर्यंत त्याच शाळेवर  कायम ठेवावे.

 4) मुख्याध्यापकाच्या निवृत्त किंवा अन्य काही कारणांनी पद रिक्त झाल्यास संबंधीत शाळेत सुधारित निकषानुसार पटसंख्या व मुख्याध्यापकाचे पद लागू होत नसल्यास मुख्यध्यापक  पद रद्द करन्यात यावे.असे नमूद करण्यात आले आहे .

 • 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार  संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील .

• पायाभूत पदापेक्षा वाढ होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीत शासन मंजुरी आवश्यक असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे .

• शिक्षण विभागाच्या 2015 च्या निर्णयानुसार सुद्धा मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी संख्या आणि पद टिकवण्यासाठी 90 विद्यार्थी संख्या आवश्यक होती मात्र या निर्णयात बदल करून विद्यार्थी संख्या 150 करण्यात आली होती .

• या शासन निर्णयाला विरोध करण्यात आला होता त्यामुळे आता मुख्याध्यापक पदासाठी पूर्वीचाच नियम लागू होणार आहे .

• मुख्याध्यापक हे पद शाळा प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पहा लिंक 

Comments