विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत गायी-म्हशी व कडबाकुट्टीसाठी अनुदान व बरेच काही....

 



• विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2

• महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल - 

सन 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्यासाठी  पथदर्शी आराखड्याचा अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केला. यातील मुद्दे पुढीलप्रमाणे-

1. ज्या जिल्ह्यांचा राज्याच्या सकल GDP मध्ये कमी सहभाग आहे, अशा जिल्ह्यांचा सर्वसमावेशक , शाश्वत व संतुलित विकास व्हावा.

2. राज्याच्या आर्थिक विकासाला गती द्यावी याच बरोबर आधीच अस्तित्वात असलेला असमतोल कमी करण्याचा प्रयत्न व्हावा.

3.  आर्थिक विकासासाठी ज्या 7 घटकांना प्राधान्य देण्याचे सांगितले. या सात घटकांपैकी शेती व शेतीपूरक व्यवसाय अंतर्गत दुग्धव्यवसाय या विभागाचा समावेश होतो.

• दुग्ध व्यवसाय व महाराष्ट्र -

1. सन 2023-24 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक आहे.

2.  देशात दरडोई दूध सेवन करण्याचे प्रमाण 459 ग्रॅम प्रतिव्यक्ती प्रतिदिन असून पंजाबमध्ये हेच प्रमाण 1283 ग्रॅम आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण 329 ग्रॅम आहे.

3. महाराष्ट्र राज्यात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो तर तुलनेत मराठवाडा व विदर्भात कमी प्रमाणात केला जातो.

4. प्रयत्न केल्यास राज्यात दुधाचे उत्पन्न वाढवले जावू शकते.

5. विदर्भ व मराठवाड्यात कमी पाऊस पडतो म्हणून येथील उत्पन्न देखील कमी आहे. यामुळे या भागात आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढत आहे.

6. दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय असून यातून प्रयत्न केल्यास शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

• विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-1 

• विदर्भ व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात सन 2016 ते 2022 या काळात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-1”  राबविला होता.

• विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2

 • विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-1 हा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील सर्वच 19 जिल्ह्यात सन 2024-25 ते 2026-27 या तीन वर्षाच्या काळात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 राबविला जाणार आहे.

• कार्यक्षेत्र - विदर्भ व मराठवाड्यातील सर्व 19 जिल्हे.

• कालावधी -सन 2024-25 ते 2026-27 या तीन वर्षाच्या काळात.

• उद्दिष्टे -
1.रोजगार निर्मिती
2. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
3. उच्च दुग्ध क्षमता असलेल्या गायी म्हशी चे वाटप.
4. पशु आरोग्य सेवा पुरविणे.
5. दर्जेदार चारा पुरविणे.
6. कृत्रिम रेतनाची सुविधा पुरविणे व दुधाळ जनावरांच्या संख्येत वाढ करणे.

• विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत 9 प्रकारचे लाभ शेतकऱ्यांना पुरविले जाणार आहेत. ते पुढीप्रमाणे आहेत.

• लाभ क्र.1. उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे वाटप :- 
 विदर्भ व मराठवाड्यातील सर्वच 19 जिल्ह्यात 3 वर्षाच्या कालावधीत 13,400 दुधाळ गायी व म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे.

• अटी/शर्ती :-
(1) 1 लाभार्थ्यास प्रतीदिन किमान ८ ते १० लिटर दुध उत्पादन क्षमतेच्या एका गाय किंवा म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे.
(2) वाटप केलेल्या गायी-म्हशीना DigitalTracking Cow Collar लावून Jio tagging करणेबांधनकारक आहे .
(3 ) गाय किंवा म्हैस ३ वर्ष विकता येणार नाही.
(4) वाटप के लेली गाय / म्हैस प्रकल्प संचालक, विदर्भ व मराठवाडा यांचे नावे तारण राहील.
(5) गायी म्हशी यांचा ३ वर्षा साठी विमा उतरविणे बंधनकारक राहील.
(6) विमा उतरविलेले दुधाळ जनावर मेल्यास दुसरे खरेदी करणे अनिवार्य राहील. रोख भरपाई मिळणार येणार नाही.

• लाभार्थी निवडीचे निकष :-

(1) शेतकऱ्याच्या स्व मालकीची कमीत कमी २ दुधाळ जनावरे असावीत.
(2) शेतकऱ्याने मागील वर्षभरात किमान 3 महिने खाजगी किंवा सहकारी दूध संकलन केंद्रात दूध विक्री केलेले आवश्यक.
(3) प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात ज्या शेतकर्यांनी लाभ घेतला आहे, असे शेतकरी, या टप्यात सदर लाभ घेण्यास पात्र नाहीत.
(4) कुटुबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र असेल.
(5) एका गावात जास्तीत जास्त 5  लाभार्थी पात्र .

• अनुदान वाटप:-

(1)  राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सेवेतून अथवा खुल्या बाजारातून उच्च उत्पादन क्षमतेच्या गायी-म्हशींची खरेदी करता येईल.
(2) प्रती गाय/म्हशीची किंमत 1 लाख रुपये गृहीत आहे.
(3)  50 % अथवा 50 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल.
(4) गाय / म्हैस खरेदीचा पुरावा आणि विमा पावती सादर केल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान बँक खात्यात dbt द्वारे जमा करण्यात येईल.

• लाभ क्र. 2. - शेतकऱ्यांना विद्युतचलित कडबाकुट्टी संयंत्राचे वाटप.

• अनुदानाचे स्वरूप :-
1. एका विद्युतचवलत कडबाकुट्टी यंत्राची किंमत 30 हजार रुपये गृहीत धरण्यात आली आहे.

2.कडबाकुट्टी  खरेदी किमतीच्या 50 % किंवा 15 हजार रुपये पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाईल.

• लाभार्थी संख्या - 10 हजार लाभार्थी

• लाभार्थी निकष - 
(1) लाभार्थ्याकडे  ३ ते४ दुधाळ जनावरे हवीत.
(2) विद्युत जोडणी असावी.
(3) प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात ज्या शेतकर्यांनी लाभ घेतला आहे, असे शेतकरी, या टप्यात सदर लाभ घेण्यास पात्र नाहीत.
(4) लाभार्थ्यांने किमान 2 HP ची ISI मार्क कडबाकुट्टी
 खरेदी करावी.

• अनुदान वितरण :-  कडबाकुट्टी  खरेदी केल्याची 
GST बिलासह पावती सादर केल्यानांतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात dbt द्वारे जमा करण्यात येईल.

लाभ क्र 3. उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणाांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना  वाटप 

लाभ क्र 4.दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी पशु प्रजनन पुरकखाद्य पुरवठा

लाभ क्र 5. दुधातील फॅट  एसएनएफ वर्धक  खाद्य पुरकांचा पुरवठा

लाभ क्र 6.बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान

लाभ क्र 7. मुरघास वाटप

लाभ क्र. 8. गायी-म्हशींमधील वंध्यत्स निवारण कार्यक्रम

लाभ क्र 9. आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना पहा लिंक 

Comments