• अंगणवाडी केंद्रांना मिळणार सौर उर्जा संच •

• अंगणवाडी केंद्रांना मिळणार सौर उर्जा संच •

• महिला व बाल विकास,भारत सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना चालविली जाते.

• या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 ला करण्यात आली . 

• या अंतर्गत 6 वर्षांच्या बालक गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांना सेवा पुरविली जाते .

• या अंतर्गत पूरक पोषण , पोषण आणि आरोग्य शिक्षण , लसीकरण , आरोग्य तपासणी,  संदर्भ सेवा,  पूर्व प्राथमिक शिक्षण इत्यादी सेवा दिल्या जातात .

• या भारत सरकार पुरस्कृत योजनेत महाराष्ट्र राज्यात 110556 अंगणवाडी केंद्र आहेत .

• यापैकी काही अंगणवाडी केद्रांना विद्यूत जोडणी आहे तर काही अंगणवाडी केंद्रांना विद्यूत जोडणी नाही .

• विद्यूत जोडणी नसलेल्या अंगणवाडी केंद्रांना  सन 2024 - 25 च्या अर्थसंकल्पात विद्यूत जोडणी ची सुविधा करून देण्याची घोषणा केली गेली आहे . 

• या घोषणेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण 110556 अंगनवाडी केद्रांपैकी विद्यूत जोडणी नसलेल्या 37000 अंगणवाडी केद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहेत  .

• या अर्थसंकल्पीय घोषणेची अंमलबजावणी करण्याकरीता महाराष्ट्र सरकारने दिनांक 5 सप्टेबर 2024 ला शासन निर्णय निर्गमित केला आहे .

• एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत स्वमालकीचा  जागेत अथवा इमारतीत असणाऱ्या ज्या अंगणवाडी केद्रांना विद्यूत जोडणी नाही अशा अंगणवाडी केद्रांना 1 किलो वॅट क्षमतेचे विद्यूत पारेषण विरहित सौर उर्जा संच देण्यात येणार असल्याची देण्यात आली .

• सदयस्थितीत राज्यातील एकूण अंगणवाडी केद्रांपैकी 36978 स्वमालकीच्या इमाररीत टप्प्याटप्याने  1 किलो वॅट चे सौर उर्जा संच पुरविण्यात येणार आहेत . 

• सदर योजने अंतर्गत पात्र अंगणवाडींना अंदाजे 152346 रु . चे सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहेत  .

• या खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .
1. ग्रीड सौर संच - 1,35,346/- रुपये
2. ईभे करणे -14,000/- रुपये
3. फ़ाउंडेशन -3,000/- रुपये
 4 .  एकूण - 1,52,346/ रुपये

• अंगणवाडी केंद्रांना सौर उर्जा संच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाउर्जा MEDA)  मार्फत बसविण्यात येतील .

मुख्याध्यापक पदासाठी आता 100 पटसंख्या आवश्यक पहा लिंक 

Comments