अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
2) पोस्ट - मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना -
- ही योजना भारत शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालय द्वारे पुरस्कृत आहे , राज्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या द्वारे राबविली जाते.
- सदर योजनेंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
- या योजनेंमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असायला हवे.
- विद्यार्थ्यांनी गत वर्षात ५०% पेक्षा जास्त गुण मिळविलेले असायला हवेत.
- या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
3) मेरिट कम मिन्स शिष्यवृत्ती -
- ही योजना भारत सरकार च्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालय पुरस्कृत असून राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय यांचेमार्फत राबविली जाते.
- तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमा करीता शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
- या योजनेंत पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी हवे.
- विद्यार्थ्यांनी गत वर्षात ५०% पेक्षा जास्त गुण मिळविलेले असायला हवेत.
- या शिष्यवृत्तीसाठी online अर्ज करावा लागतो.
••राज्यशासनाची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना
पात्रता व अटी-
1) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) अर्जदाराने माध्यमिक शालान्त परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
3) अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये ८.०० लाखांपेक्षा जास्त नसावे.
4) अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.
5)नूतनीकरणासाठी अर्जदाराने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे
शिष्यवृत्तीची रक्कम
1) सदर योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ष रु. २५,०००/- किंवा प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क या पैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
2)तर कला, विज्ञान वा वाणिज्य, कृषी, विधी व इत्तर कला शाखांतील अभ्यासक्रमाच्या तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते
अर्ज कसा करावा ?
या योजनेत अर्ज करण्याचे वेळापत्रक व जाहिरात दरवर्षी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द केले जाते. सदर वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर online अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळांवर क्लिक करा. mahadbtmahait.gov.in
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या
www.dmer.org
www.dte.org.in
शिष्यवृत्तीची रक्कम कशा प्रकारे मिळेल ?
1) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम E.C.S. / N.E.F.T मार्फत बँक खात्यात थेटपणे जमा करण्यात येते
शिष्यवृत्तीशी संदर्भाने अडचणी आल्यास कोणाकडे संपर्क साधला जावा.
वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जस रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय ३ महानगरपालिका मार्ग , मुंबई-४०० ००१ यांचेकडे संपर्क साधावा.
महिलांसाठी पिंक (गुलाबी) ई रिक्षा अनुदान योजना पहा लिंक
https://informationsupport11.blogspot.com/2024/08/blog-post.html
Comments
Post a Comment