गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
•स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना•
शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना विविध अपघात घडत असतात. उदा. विजेचा धक्का, अंगावर विज पडणे, सर्पदंश, फवारणी करताना विषबाधा इत्यादी अपघात शेती व्यवसाय करताना प्रामुख्याने घडतात. अशा अपघातात शेतकरी मृत्यूमुखी पडतो किंवा त्याला कायमचे अपंगत्व येते.
अशा प्रसंगी शेतकरी कुटुंबात आर्थिक मदत करण्याच्या हेतूने प्रेरित ही योजना महाराष्ट्र राज्यात शासनाद्वारे राबविली जाते.
शेतकरी कष्टकरी यांचे नेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने ही योजना कार्यान्वित केली आहे .
• या योजनेंतर्गत खालील लाभ अनुज्ञेय आहेत.•
१) अपघातने मृत्यू झाल्यास - 2 लक्ष रुपये
२) अपघातात 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय निकामी झाल्यास - 2 लक्ष रुपये
३) अपघातात 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय
निकामी झाल्यास - 2 लक्ष रुपये
४) अपघातात 1 डोळा अथवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास - 1 लक्ष रुपये
• लाभ मिळवण्यासाठी पात्रता पुढीप्रमाणे •
नावावर शेतजमीन असणारे किंवा सातबाऱ्यावर नाव असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतील.
परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावर नाव नाही, परतू शेतकरी कुटुंबातील आहे, अशा शेतकरी कुटुंबातील कोनीही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे.
अर्जदार हा 10 वर्षे ते 75 वर्षे या वयोगतातील असावा
• पुढीलपैकी अपघात लाभासाठी पात्र आहेत •
1.रस्ता किंवा रेल्वे अपघात
2.पाण्यात बुडून मृत्यू
3.जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
4.विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
5.वीज पडून मृत्यू
6.खून
7.उंचावरून पडून झालेला अपघात
8.सर्पदंश व विंचूदंश
9.नक्षलाईटकडून झालेल्या हत्या
10.जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
11.बाळंतपणातील मृत्यू
12.दंगल
• पुढील अपघात लाभासाठी अपात्र आहेत •
1.नैसर्गिक मृत्यू
2.योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व
3.आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा जाणीवपूर्वक स्वत:लाच हेतुपूर्वक जखमी करुन घेणे
4.गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करताना झालेला अपघात
5.अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात
6.भ्रमिष्टपणा
7.शरीरांतर्गत रक्तस्राव
8.मोटार शर्यतीतील अपघात
9.युद्ध
10.सैन्यातील नोकरी
• अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावे लागतील •
१.सातबारा उतारा
२.मृत्यू झाल्यास मृत्यू दाखला
3.वारसदाराची तलाठ्याकडील गाव नमुना न. 6- क नुसार मुंजूर
झालेली वारसाची नोंद.
4.शेतकऱ्याचे वय पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला ( t.c.) / aadhar card/मतदान ओळखपत्र
5.प्रथम माहिती अहवाल किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटील माहीती अहवाल
6.अपघातानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत जोडवायची कागदपत्रे.
![]() |
• कार्यपद्धती •
शेतकरी अपघाताने मृत्यूमुखी पडल्यास 30 दिवसात सदर प्रस्ताव संबंधित कुटुंबातील कोणीही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करावा.
अशाप्रकारचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महसूल, पोलिस आणि कृषी अधिकारी यांची टीम प्रत्यक्ष घटनास्थळी येवून पंचनामा करील व आठ दिवसात अहवाल मा. तहसीलदार यांना देईल.
मा. तहसीलदार हे अध्यक्ष असलेली समिती 30 दिवसात अपघात ग्रस्त कुटुंबाला मदत देण्याचा निर्णय घेईल.
• प्रस्ताव असा असेल •
![]() |









Comments
Post a Comment