नागरिकांना 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार, अशी आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 
-----------------------------------------------
• सुरुवात -
1. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची  सुरुवात सप्टेंबर 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या योजनेला आता सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत.

2. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्यसेवा देणारी सरकारी योजना आहे.

• उद्दिष्टे -
 1. देशातील सर्व नागरिकांना तसेच विशेषकरून दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हे दूरगामी उद्दिष्ट प्रधानमंत्री यांनी या योजनेमागे ठेवले आहे. 

2. या योजनेअंतर्गत नागरिकांना उत्तम दर्जाचे उपचार देणे क्रमप्राप्त आहे .

3. आर्थिक कारणांमुळे उपचार न घेणाऱ्या अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढने आणि देशातील नागरिकांचे कल्याण करणे आणि त्यांचे आरोग्याच्या दर्जा सुधारणे .

4. कोणत्याही भारतीयाला त्यांच्या आर्थिक परीस्थितीमुळे आरोग्यसेवा नाकारली जावू नये किंवा त्याने उपचार नाकारु नयेत. 

• लाभ -
1. आयुष्यमान भारत योजनेतून प्रति कुटुंब 5.00 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक सुरक्षा कवचासह आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना देशातील काही सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्व वैद्यकीय सेवा मोफत मिळण्याची सुविधा  या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली आहे.

 2. आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ उतार वयात इतरांवर अवलंबून असलेल्या किंवा सेवानिवृत्त  वयोवृद्धांना आणि  70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांना अलीकडेच उपलब्ध करून दिला गेला आहे.

3. अगोदर सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांची कुटुंबे, मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते,  आशा सेविका ,अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनिस यांनाच या योजनेखाली समाविष्ट केले गेले होते.

4. आज रोजी या योजनेअंतर्गत 55 कोटी पेक्षा जास्त नागरिक आरोग्यसेवेसाठी पात्र आहेत आणि 7 कोटी 50 लाखापेक्षा अधिक रुग्णांना उपचारासाठी 1 लाख कोटी रुपयांची मदत यशस्वीरित्या पूर्ण पुरविलेली आहे. 

• योजनेत जटील शस्त्रक्रियेचा अंतर्भाव -

या योजनेअंतर्गत बायपास, सांधे बदलणे यासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आहेतच परंतु  कर्करोग आणि मूत्रपिंड यादीवरील उपचारासह 1900 हून अधिक वैद्यकीय उपचार प्रक्रियांचा समावेश  करण्यात आलेला आहे .

• या योजनेअंतर्गत बांधील रुग्णालये.-
या योजनेअंतर्गत आज 13 हजार हून अधिक खाजगी रुग्णालये आणि संपूर्ण भारतातील 29 हजाराहून अधिक रुग्णालय या योजनेअंतर्गत बांधील करण्यात आले आहेत.

• पोर्टेबिलिटी सुविधा -
 
या योजनेअंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना ते ज्या राज्याचे रहिवासी आहेत त्या व्यतिरिक्त इतर राज्यात किंवा  देशात इतरत्र असलेला रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत. 

• आयुष्यमान आरोग्य मंदिराची स्थापना -
या योजनेसमवेत शासन आयुष्यमान आरोग्य मंदिराची स्थापना करणार आहे .यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट होतील.

आयुष्यमान आरोग्य मंदिरे प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

आतापर्यंत भारत देशामध्ये 1 लाख 73 हजाराहून अधिक आरोग्य मंदिरांची स्थापना करण्यात आलेली आहे.

या आरोग्य मंदिरामध्ये विविध सामान्य आजारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या दीर्घकालीन आजारा संदर्भात रुग्णांची मोफत तपासणी आणि निदान केले जाईल तसेच त्यांना औषधे दिली जातील.

• पारदर्शी कारभार -
या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत  आता सर्व योजने संदर्भातील कारभार अती जलद आणि पारदर्शीपणे व्हावा यासाठी याला माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सेवासुविधांची जोडणी करण्यात आलेली आहे .

यामुळे पारदर्शकता ,परिणामकारकता आणि दाव्यांच्या जलद तडजोडी होणार आहेत .

आधार कार्डवर आधारित बायोमेट्रिक पडताळणी असल्यामुळे कागदरहित दावे निकाली निघणार आहेत. यामुळे या सार्वजनिक हिताच्या योजनेमध्ये होणारे भ्रष्टाचार टाळता येणार आहेत.

अधिक विशेष  माहिती साठी पहा खालील लिंक

Comments