सेमीकंडक्टर आणि भारत
सेमी कंडक्टर म्हणजे काय ?
पदार्थांच्या गुणधर्मात विद्यूतवाहकता हा एक गुणधर्म आपण अभ्यासत असतो . पदार्थ विद्यूतचे वहन करतो अथवा नाही या गुणधर्मा ला विद्यूतवाहकता म्हणतात .शक्यतो धातू हे विद्यूत चे वाहक असतात उदा . तांबे लोखंड ॲल्यूमिनियम इत्यादी .अधातू हे विद्यूतचे रोधक असतात उदा . लाकूड रबर प्लॅस्टीक काच इत्यादी .या व्यातिरिक्त असे काही पदार्थ असतात ते कधी विद्यूत वाहकचे कार्य करतात तर कधी विद्यूत रोधकाचे कार्य करतात अशा पदार्थांना च सेमी कंडक्टर म्हणतात . उदा . सिलीकॉन ( Si ) जर्मेनियम (ge ) हे पदार्थ
सेमी कंडक्टर कशात वापरतात :
स्मार्ट फोन, संगणक , लॅपटॉप, टीव्ही, रेडिओ, मेमरी कार्ड अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये लहान आकाराच्या परंतु महत्वाच्या काही चिप्स लागतात त्या चिप्स ला सेमीकंडक्टर म्हणतात.
सेमी कंडक्टर निर्मिती करणारे देश :
अशा सेमीकंडक्टर चिप्स ची निर्मिती चीन, तैवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान आणि अमेरिका फक्त याच देशात बनविल्या जातात.
सेमी कंडक्टर चीप - वॉर :
यातील अमेरिका आणि जपान सोडले तर बाकी वरील देशांमध्ये अशा सेमीकंडक्टर चिप्स बनवण्याचा उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर बहरलेला आहे .
या सेमी कंडक्टर उद्योगात चीन चे वर्चस्व आहे . हेच वर्चस्व अमेरिकेच्या पचनी पडलेले नाही , म्हणूनच अमेरीकेने चीन वर निर्बध घातले आहेत .
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका आणि चीनमधील चीप - वॉर चा फायदा घेऊन भारताने या क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरवले .
सेमीकंडक्टरचा उद्योग भारतात बहरला तर चीनला चांगला पर्याय उभा राहू शकतो
भारताचे सेमिकंडक्टर धोरण :
आपल्या भारत देशाचे पहिले सेमीकंडक्टर धोरण सन 2007 साली UPA सरकारच्या काळात जाहीर केले गेले. तरीसुद्धा सेमीकंडक्टर उद्योगास फारशी चालना मिळाली नाही किंवा सेमीकंडक्टर उद्योगाची भरभराट झाली नाही.
भारताची सेमी कंडक्टर मोहीम :
2021 या वर्षापासूनच भारताने सेमी कंडक्टर उद्योग या मोहिमेला सुरुवात केली आहे. यासाठी 76 हजार कोटी रुपयाच्या निधीची ही तरतुद केली गेली आहे.
भारतात सेमी कंडक्टर युनिटची उभारणी :
भारतात पाच सेमी कंडक्टर युनिटची उभारणी केली जाणार आहे .
1 ) धोलेरा - गुजरात 1 यूनिट
2 ) सानंद - गुजरात 2 यूनिट
3 ) मोरीगाव - आराम 1 यूनिट
4 ) तळोजा पालघर - महाराष्ट्र 1 यूनिट
1 ) धोलेरा - गुजरात प्रकल्प :
भारतीय " टाटा समुह " तैवान या देशातील पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या कंपनी सोबत बरोबरीने धोलेरा - गुजरात येथे प्रकल्पाची उभारणी करणार आहे .
2 ) सानंद - गुजरात प्रकल्प :
गुजरात राज्यातीलच सानंद येथे दोन चीप पॅकेजिंग युनिट ची उभारणी केली जाणार आहे .
3 ) मोरीगाव - आराम प्रकल्प :
आसाम राज्यातील मोरेगाव येथे एक चीप पॅकेजिंग युनिट ची उभारणी केली जाणार आहे .
4 ) तळोजा पालघर - महाराष्ट्र प्रकल्प :
महाराष्ट्रा राज्यातील पनवेल जिल्हयातील तळोजा एमआयडीसी येथे इस्त्रायल मधील चीफ निर्मिती मधील टॉवर नावाची कंपनी सेमी कंडक्टर प्रकल्पा ची उभारणी करणार आहे
सद्यस्थितीत भारतात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी कंपन्या :
1 ) रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन कंपनी - जपान
2 ) स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स कंपनी - थायलंड
3 ) केन्स सेविकॉन आउट सोर्सड असेंम्ली अँड टेस्टिंग - थायलंड
4 ) टॉवर कंपनी इस्त्रायल
5 ) पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन कंपनी - तैवान
भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब :
भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर फॅब ची उभारणी आयआयटी कानपूरच्या प्रभाकर गोयल यांच्या गेटवे डिझाईन ऑटोमेशन यांनी केली आहे .
सहकार्य व समन्वय :
जर भारतात सेमी कंडक्टर उदयोग क्षेत्रात परदेशी गुंतवणूक हवी असेल तर या सेमी कंडक्टर उद्योगासाठी मोठी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल . उच्च प्रतीचे शुद्ध पाणी द्यावे लागेल . अखडीत वीज द्यावी लागेल . या उद्योगातून प्रचंड रासायनिक कचरा निर्माण होतो याची विल्हेवाट नियमावली बनवावी लागेल .
विविध विभागाचे मंत्रालय आणि सरकारी खाते यांचा परस्पर समन्वय असावा लागेल .
8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या OBC विद्यार्थ्यांनाही शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित पहा लिंक मध्ये
Comments
Post a Comment