• OBC विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा मिळणार लाभ• आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या OBC विद्यार्थ्यांनाही शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा मिळणार लाभ





• आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या OBC विद्यार्थांना उत्पन्न प्रमाणपत्राची अट रद्द करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे.  याचा फायदा इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे . आता परीक्षा शुल्क  प्रतिपूर्ती योजनेचा लाभ आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले विद्यार्थी सुद्धा घेतील.

• दोन लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थांना लाभ :-

2 लाख रुपये उत्पन्न किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या obc विद्यार्थ्यांना 50 टक्के शिष्यवृत्ती मिळत आहे .

• आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थांना लाभ:-
 
 8 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थांना केवळ शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सुट मिळत आहे.
अगोदर उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये होती . नंतर सन 2017 -18 या शैक्षणिक सत्रापासून ही उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये केली होती. 

8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थांना कोणताच लाभ मिळत नव्हता .  8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थांनाही लाभ मिळणार आहे

• नवीन शासन निर्णय :-

• आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या विद्यार्थांना लाभ:-

 परंतु 8 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या obc विद्यार्थांना कोणतीच सूट मिळत नव्हती.त्यांना शालेय अथवा महाविद्यालयीन प्रवेशाकरिता लाखो रुपयांचे शुल्क भरावे लागत असे. म्हणूनच सरकारने obc विद्यार्थ्यांच्या उत्पन्नाची अट रद्द केली असून 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण शुल्कात सूट मिळणार आहे.मात्र त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र द्यावे लागेल.

• हा शासन निर्णय  8 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती च्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ देणार आहे.

• महाराष्ट्र राज्यातील शासकीय - अशासकीय, शासनाने मान्यता दिलेली खाजगी विनाअनुदानित, कायम विनअनुदानित महाविद्यालये - तंत्रनिकेतने, व शासकीय विद्यापीठे यात विनाआनुदानात असलेल्या निवडक व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विमुक्त जाती, भटक्या जमाती,obc व इतर मागास प्रवर्ग यामधील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सूट मिळणार आहे.

• यामुळे लाखो वंचित पाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Comments