राज्यमाता- गोमाता शासन निर्णय

•देशी गायींना " राज्यमाता - गोमाता " म्हणून दर्जा दिल्याची घोषणा -
_________________________________________

• कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व
मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य या विभागाने देशी गायींना " रज्यमाता - गोमाता " म्हणून  घोषित केले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय
 दि.30 /09/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

• देशी गाईचे महत्व -
1. वैदिक काळापासून स्थान :
 हिंदू धर्मानुसार देशी गायींच्या शरीरात 33 कोटी देव - देवता निवास करतात. हिंदू संस्कृतीत अगदी पवित्र असणारी गाय वैज्ञानिक दृष्ट्या ही अगदी उपयुक्त आहे , असे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे.

2. कामधेनू :
अगदी अनादी काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गाईंचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान राहिलेले आहे. वैदिक काळापासून गायींचे असणारे धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेता, गाईंना 
"कामधेनु"असे संबोधले जाते.

3. पूर्णान्न:
देशी जातीच्या गाईच्या दुधाचे मानवाच्या आहारात पौष्टिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे.
देशी जातीच्या गायीच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वपूर्ण असे अन्नघटक असतात म्हणून देशी जातीच्या गायींना " पूर्ण अन्न " असे सुद्धा
म्हणतात. 

4. आयुर्वेदात स्थान:
विविध आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदीक औषधी बनवण्यासाठी देशी जातीच्या गायीचे  दूध वापरतात.

5. पंचगव्य:
पंचगव्य उपचार पद्धती मध्ये देशी जातीच्या गाईच्या दुधाचा वापर करतात.

6. सेंद्रिय शेती:
देशी गाईच्या शेण तथा गोमुत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे.जमीन सुपीक बनवण्याकरिता तथा शेती जास्त पिकवण्यासाठी देशी गायींचे शेण आणि गोमूत्र महत्वाचे असते.

• राज्यातील विभिन्न  भागात विभिन्न जातीच्या देशी गायी आढळून येतात .
उदाहरणार्थ 

1.मराठवाड्यात कंधारी ,देवणी  या देशी जातीच्या गायी आढळून येतात.

•देवणी
देवणी गाय ही एक भारतीय जातीची देशी गाय असून ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी  मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. देवणी गाय ही दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन अंगी बाळगते तसेच  शेतीकामासाठी या जातीचे बैल पण उपयुक्त आहे.

•कंधारी 
लाल कंधारी गाय ही एक देशी जातीची गाय असून ती महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात आढळते . या देशी जातीच्या गायीची दूध देण्याची क्षमता सामान्य आहे मात्र शेतीकामासाठी बैल खूप उपयुक्त आहेत.

2.पश्चिम महाराष्ट्रात खिलार ही देशी जातीची गाय आढळून येते.

खिल्लार 
खिल्लार किंवा खिल्लारी गाय ही शुद्ध देशी गाय असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा,  पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. या गायीच्या काही उपजाती आहेत त्या पुढीप्रमाणे आहेत.काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी.

3.उत्तर महाराष्ट्रात डांगी ही देशी जातीची गाय आढळून येते.

• डांगी 
डांगी गाय ही  एक देशी गाय असून महाराष्ट्रातील नाशिक ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. या गायीची दूध देण्याची क्षमता ही ६ लिटर (एका वेळेस) पर्यंत आहे. शेतीकामासाठी बैल सुद्धा उपयुक्त आहे. ही गाय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकणारी गाय आहे.

4.विदर्भात गवळाऊ  या देशी जातीची गाय आढळून येते.

• गवळाऊ
गवळाऊ गाय या शुद्ध देशी गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भागात आढळते. ही देशी गाय नंद गवळी या लोकांकडून पाळली जाते. शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितात. 

•देशी जातवान  गायींचे मानवी आहारात तसेच जीवनात अनन्यसाधारण स्थान, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींचे शेण तथा गोमुत्राचे महत्त्व विचारात घेता , दिवसेंदिवस देशी जातीच्या गायीच्या प्रमाणामध्ये प्रचंड स्वरूपात घट होताना दिसत आहे ही चिंतेची भाव आहे. 

शुध्द देशी जातीच्या गायींचे अत्यंत महत्व व  भारतीय तथा हिंदू संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले विशेष स्थान, देशी गायींपासून मिळणाऱ्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी जातीच्या गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये असलेले महत्व विचारात घेतले असता, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्ट्टीने देशी जातीच्या गायीस “राज्यमाता- गोमाता”  म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

केंद्रशित प्रदेश पहा लिंक 

Comments