तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी ( ट्रम्पेट ) - एक निर्माण झालेला गोंधळ....

• तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट - एक निर्माण झालेला गोंधळ....



राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असे आहे, परंतु या चिन्हाचा प्रचार जनमानसात मात्र तुतारी असाच केला जातो.

यातही ग्रामीण अथवा अशिक्षित माणसे तुतारी ला पिपाणी (ट्रम्पेट) असे म्हणतात वा समजतात.

या बाबीचा परिणाम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला पडणारे मतदान तुतारीलाच पिपाणी (ट्रम्पेट) समजून पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर पडताना दिसत आहे.

लोकसभा 2024 निवडणुकीत हीच बाब घडली होती परंतु लोकसभा मतदार संघाचे मतदान जास्त असल्याने ही बाब लक्षात घेतली गेली नाही किंवा या गोष्टीचा परिणाम निर्णायक असा दिसून आला नाही. तरीही दोन लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाला फटका बसला होता.

मात्र महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत या तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी (ट्रम्पेट)  चिन्हाच्या गोंधळाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाला खूपच बसला.


महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे सात उमेदवार पिपाणी (ट्रम्पेट) मुळे पराभूत झाले.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. विजय भांबळे अवघ्या 4554 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या विनोद भावळे यांना 7430 मते मिळाली.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. राजेश टोपे अवघ्या 2309 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या बाबासाहेब शेळके यांना 4830 मते मिळाली.

शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. पांडुरंग बरोरा अवघ्या 1672 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या रुपाली अराज यांना 3892 मते मिळाली.

बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. संदीप नाईक अवघ्या 377 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रे यांना 2860 मते मिळाली.

अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. फाहद अहमद अवघ्या 3378 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या जयप्रकाश अग्रवाल  यांना 4075 मते मिळाली.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री.देवदत्त निकम अवघ्या 1523 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या देवदत्त शिवाजीराव निकम यांना 2965 मते मिळाली.


पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्रीमती राणी लंके अवघ्या 1526 मतांनी पराभूत झाल्या, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या सखाराम सारक यांना 3582 मते मिळाली.

केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्रीमती पृथ्वीराज साठे अवघ्या 2687 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या  उमेदवाराला  3559 मते मिळाली.


परांडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षाचे श्री. राहुल मोटे अवघ्या 1509 मतांनी पराभूत झाले, तेथे पिपाणी (ट्रम्पेट) या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांला 4446 मते मिळाली.


म्हणून शरदचंद्र जी  पवारांनी पिपाणी (ट्रम्पेट)  हे चिन्ह गोठवावे अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे..


Comments