महायुती यशस्वी होण्यामागची कारणे....

 


महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले. 

काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात म्हणावे तसे यश प्राप्त झाले नव्हते . आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न चिघळलेला असताना महायुतीला यश मिळेलच असे कोणालाही वाटत नव्हते.

मग तीन महिन्यातच महायुतीने काय जादू केली , कोणते यशाचे सूत्र वापरले , कोणत्या योजना आखल्या जेणेकरून महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले ते आपण पाहणार आहोत.

1. लाडकी बहिण योजना :-
       लोकसभेतील पराभवानंतर  विधानसभा जिंकायच्या असतील तर काहीतरी वेगळी योजना आखावी लागणार आहे हे महायुतीच्या नेत्यांनी लक्षात आले होते. म्हणून विधानसभा निवडणुक जवळ आली असतानाच महायुतीच्या शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केली.या योजनेच्या अंमलबजावणी मुळे  मध्यप्रदेश मध्ये भाजपला यश प्राप्त झाले होते. म्हणूनच ही योजना महाराष्ट्रात लागू केल्यास फायदा होईल असे महायुतीच्या लक्षात आले. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अडीच कोटी महिलांना रोख स्वरूपात लाभ देण्याचे महायुती सरकारने ठरवले . या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात. विधान सभा निवडणूकीच्या अगोदरच 7500 रुपयांपर्यंत लाभ महिलांना थेट खात्यात मिळाला.
       या योजनेच्या प्रचार व प्रसारात ही महायुती कमी पडली नाही. सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये दिले जातील असेही महायुतीने आश्वासन दिले.
       तसेच महविकास आघाडी ने या योजनेवर केलेली टीका टिप्पणी पाहता महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ही योजना बंद करणार आहे याची सविस्तर मांडणी महायुतीने केली. परिणामस्वरूप  महिला मतदारांची टक्केवारी वाढली.

 2.बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है'  :-

      उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक है तो सेफ है' ही घोषणा दिली होती. महाविकास आघाडीला महायुतीच्या विरोधात जशास तसं उत्तर देणे क्रमप्राप्त होते परंतु कोणतेही उत्तर दिल्याचं दिसलं नाही.
 
3. व्होट जिहाद, धर्मयुद्ध, महाभारत :-
  तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट वोट जिहाद चा आरोप करून आम्ही धर्मयुद्ध करायला तयार आहोत असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हा महाभारताचा मुद्दा ग्रामीन जनतेला भावला. याला तोडीचा मुद्दा महाविकास आघाडीकडे नव्हता , व याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडी अपयशी ठरली.

4.वीज बिल माफ :-
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना 7.5 hp च्या आतील पंपांचे वीज बिल संपूर्ण माफ करण्याचा निर्णय महायुतीला फायद्याचा ठरला.

5.सोयाबीन ला हमी भाव:-
महविकास आघाडीने सोयाबीन ला 5000 रू हमीभाव घोषित केल्यानंतर  महायुतीने 6000 रू हमीभाव जाहीर केला , सत्तेत असल्यामुळे महायुतीच्या निर्णयाचा प्रभाव जास्त पडला.

6.जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा ची घोषणा :-
    मराठा आरक्षण प्रश्न चिघळल्यामुळे व महायुती वर असणारा मराठा समाजाचा रोष पाहता पर्याय म्हणून अगदी पद्धतशीरपणे ओबीसी मतदार महायुतीने आपल्याकडे वळवला.
    जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा
हे जाहीर भाष्य एका जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे ओबीसी मतदारांचा जास्तीचा विश्वास महायुतीवर बसला.

7.मराठा बहुल मतदार संघात तुतारी शी थेट लढत टाळली:-
ज्या मतदारसंघात मराठा समाजाच्या मतदारांची संख्या जास्त आहे अशा बहुतांशी मतदारसंघांमध्ये भाजपाने थेट तुतारीशी लढण्याचे टाळले कारण मराठा आरक्षण प्रश्नी
मराठा समाजाचा भाजपावर जास्त रोष होता व हे मतदान तुतारी च्या पारड्यात आपोआप पडणार होते म्हणून बहुतांशी अशा मतदारसंघात भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याशी लढण्याचे टाळले.

8. तुतारी विरुद्ध घड्याळ ,धनुष्यबाण विरुद्ध मशाल :-
महायुतीने बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनाच लढवले तर धनुष्यबाणाविरुद्ध मशाल अशी लढत ठरवली.
  भाजपा मात्र कुठलाही अजेंडा नसलेल्या काँग्रेस पक्षासोबत लढले परिणामी त्यांना खूप चांगल्या प्रकारचे संपादन झाले .

9. निर्णायक मत तिसरीकडे वळवण्यात यश:-
 ज्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष लढत आहेत अशा ठिकाणी भाजपाचे मतदान घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट किंवा शिवसेना शिंदे गट यांना मिळणे कठीण होते अशा ठिकाणी इतर उमेदवार उभे करून हे मतदान अपक्षाकडे वळवून महायुतीने उमेदवार निवडून आणले.

Comments