मंत्र्यांची संख्या निश्चित करणारी 91वी घटनादुरुस्ती आणि महाराष्ट्राचे संभाव्य मंत्रिमंडळ


२३ ऑक्टोबर २०२४ ला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला यामध्ये भाजप च्या १३२, शिवसेना च्या ५७, राष्ट्रवादी काँग्रेस च्या  ४१, शिवसेना (उबाठा) पक्ष च्या २०, काँग्रेस च्या १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष च्या १० व इतर १०जागा निवडून आल्या.

यामध्ये महायुती ने स्पष्ट बहुमत प्राप्त करून सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ ग्रहण केलेली असली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार व तिढा कायम आहे.

तत्पूर्वी मंत्रिमंडळ संदर्भाने संविधानातील 91 वी घटनादुरुस्ती -2003 आपण पाहू.

संविधानातील 91 वी घटनादुरुस्ती -2003:-

भारतीय संविधानातील ९१ वी घटनादुरुस्ती अधिनियम, २००३ नुसार भारतीय घटनेतील कलम क्रमांक १६४ मध्ये कलम क्र .१ A  समाविष्ट करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की “ राज्यातील मंत्रिमंडळामध्ये  मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त नसावी. 

तसेच कोणत्याही राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी ही निश्चित नसावी अशी ही तरतूद करण्यात आलेली आहे.

91 व्या घटना दुरुस्ती नुसार महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ मर्यादा:-

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण सदस्य संख्या 288 असल्यामुळे घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार महाराष्ट्राच्या विधानसभेत 43 मंत्री असणे क्रमप्राप्त आहे.यापेक्षा अधिकचे कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची असणार नाही.

मुख्यमत्री , उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी :-

आताच दिं - 05 डिसेंबर 2024 ला आझाद मैदान मुंबई  येथे पंतप्रधान श्री .नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. 

 या भव्यदिव्य शपथ सोहळ्यात महायुतीच्या केवळ तीनच नेत्यांनी शपथ ग्रहण केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ग्रहण केली तर महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या दोघांनीं  शपथ ग्रहण केली.

आता मात्र प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ निर्मितीची :-

महायुतीतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?, कोणते खाते कोणाकडे जाणार?, याचा तिढा सुटलेला दिसत नाही.  भाजपाला 20 मंत्रिपदे, शिवसेनेला 13 मंत्रिपदे तर राष्ट्रवादी काँग्रेस ला 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य मंत्री:-

भाजपा:-

1. देवेंद्र फडणवीस

2. गिरीश महाजन

3. रविंद्र चव्हाण

4. मंगलप्रभात लोढा

5. चंद्रशेखर बावनकुळे

6. आशिष शेलार

8. शिवेंद्रसिंहराजे भोसले

9. अतुल सावे/देवयानी फरांदे

10. माधुरी मिसाळ

11. चंद्रकांत पाटील

12. राधाकृष्ण विखे पाटील

13. गणेश नाईक

14. पंकजा मुंडे

15. जयकुमार रावल

16. राणा जगजिसिंह पाटील

शिवसेना:-

1. एकनाथ शिंदे

2. उदय सामंत

3. शंभूराज देसाई

4. गुलाबराव पाटील

5. निलेश राणे

6. भरत गोगावले

 7. दिपक केसरकर

8. प्रताप सरनाईक

9. तानाजी सावंत

10. राजेश क्षीरसागर

11. आशिष जैस्वाल

12. अमोल खताळ

13. नीलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी:-

1. छगन भुजबळ

2. अदिती तटकरे

3. अनिल पाटील

4. हसन मुश्रीफ

5. धर्मराव बाबा अत्राम

6. धनंजय मुंडे

8. नरहरी झिरवळ

हंगामी विधान सभा अध्यक्ष:-

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड  करण्यात आली आहे. राज्यपाल महोदय  सीपी राधाकृष्णन यांनी हंगामी विधानसभेच्या अध्यक्षांना शपथ दिली. 

Comments