पी एम किसान योजना (नवीन हप्ता मिळणार)
• शेतकऱ्यांना जीवन जगताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, मदत व्हावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहाय्य व्हावे या हेतूने आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पी एम किसान ही योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू केली.
• या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत आहेत.
• आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 18 हप्ते वितरीत करण्यात आलेले आहेत. शेवटचा हप्ता (निधी) ऑक्टोबर महिन्यात वितरीत करण्यात आला होता तर 19 वा हप्ता (निधी) फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
• कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावावर जमीन असल्यामुळे त्या कुटुंबातील पती, पत्नी , मुलगा, मुलगी इत्यादी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु केंद्रसरकारने लागू केलेल्या नवीन नियमावलीनुसार एकाच कुटुंबातील पती , पत्नी, मुलगा, मुलगी इत्यादी लाभ घेत असल्यास ते बंद होवून एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येणार आहे.
नवीन नियमावली:-
1.आधार कार्ड:- आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत पती ,पत्नी आणि मुले यांचीदेखील आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जेणेकरून एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल.
2. 2019 पूर्वीची खरेदी अथवा फेरफार:- वारसा हक्काने मिळालेली जमीन वगळता ज्या शेतकऱ्यांची 2019 पूर्वीची जमीन खरेदी आहे त्याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे.
3. 2019 पूर्वीची जमीनीची नोंद:- लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर 2019 पूर्वीची जमीनीची नोंद असावी. तरच तो या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
4. 2019 नंतरची नोंद:- 2019 नंतर करण्यात आलेली जमीन खरेदी, खातेखोड, बक्षीस पत्र असल्यास या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
5. 2019 नंतर वारसाहक्काने:- शेतकऱ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी , 2019 नंतर वारसाहक्काने जमीन मिळालेली नोंद असल्यास या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.
6. कर्मचारी :-शासकीय , निमशासकीय , शासन अंगीकृत संस्था , स्वायत्त संस्था यामधील कर्मचारी या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात आलेले आहेत.
7. आयटी रिटर्न भरणारे :- पेन्शनर, नोंदणीकृत डॉक्टर, वकील सीए, इंजिनियर इत्यादी तसेच सलग आयकर भरणाऱ्या व्यक्तींनाही या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
• शेतकऱ्यांना वारंवार करावी लागत आहे KYC:- लाभार्थी शेतकरी या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत सर्व प्रकारची कागदपत्रे सादर करतात , काही हप्ते सुद्धा उचलतात परंतु तरीही खाते बंद केले जाते व सुरू करण्यासाठी पुन्हा कागदपत्रे व पुन्हा पुन्हा KYC करायला लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:-
-7/१२
-8 ए
- आधार कार्ड (पती - पत्नी)
- फेरफार 2019 चा
- बँक पासबुक
- e kyc staus
Comments
Post a Comment