जिल्हाच्या पालकमंत्र्यांची यादी

अखेर महाराष्ट्र राज्याच्या जिल्हानिहाय पालकमंत्री पदाची यांची यादी आज  दिनांक -18/01/2025 रोजी जाहीर करण्यात आली.

 बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावाचे  सरपंच  स्व.श्री. संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर बीडचा पालकमंत्री कोण होणार? या संदर्भाने विविध तर्कवितर्क लावले जात होते.

बीड जिल्ह्याला या वेळी मुंडे बहिण-भावाच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्री पदे मिळाली. अर्थातच बीडचा पालकमंत्री या दोघा बहिण भावापैकीच एक होणार हे निश्चित मानले जात होते.

परंतु या एकाच कुटुंबातील दोघांना कॅबिनेट मंत्री पदे  मिळाल्याने बीड मधील नेते मंडळी नाराज होती. 

नाराज नेत्यांनी या दोन्ही स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत या दोघांनी पालकमंत्री पद न स्वीकारता राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवारांनी स्वतः कडे  घ्यावे , अशी मागणी केली.

विशेष म्हणजे श्री . धनंजय जी मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही, तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्हयाचे पालक मंत्री पद देण्यात आले आहे.

 या पेचामुळे  जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या निवडी प्रलंबित होत्या. परंतु प्रजासत्ताक दिनानिमित्ताने  जिल्ह्यांचे पालकमंत्री  पदे जाहीर करणे अपेक्षित होते. 

विशेष म्हणजे यावेळी तिघांच्या सह पालकमंत्री म्हणून सुद्धा निवडी करण्यात आलेल्या आहेत.

 म्हणून आज राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली ती पुढील प्रमाणे आहे :-

1. गडचिरोली - श्री. देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, मा. मुख्यमंत्री

2. ठाणे-  श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

3. मुंबई शहर - श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री

4. पुणे - श्री. अजित अशाताई अनंतराव पवार  मा. उप मुख्यमंत्री

5. बीड -श्री. अजित अशाताई अनंतराव पवार मा. उप मुख्यमंत्री

6. नागपूर -श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

7. आमरावती -श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

8. अहील्यानगर -श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील 

9. वाशीम- श्री. हसन सकीना मियालाल मुश्रीफ

10. सांगली -श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

11. नाशिक- श्री. गिरीश गीता दत्तात्रय महाजन

12. पालघर -श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

13. जळगांव -श्री. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
14. यवतमाळ -श्री. संजय प्रमिला दुलिचंद राठोड

15. मुंबइ उपनगर- ॲड.अशिष मिनल बाबाजी शेलार
श्री. मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा
 (सह-पालकमंत्री)

16. रत्नागिरी -श्री. उदय स्वरुपा रवींद्र सामंत

17. धुळे -श्री. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

18. जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

19. नांदेड- श्री. अतूल लिलावती मोरेश्वर सावे

20. चंद्रपूर -डॉ. अशोक जनाबाई रामाजी उइके

21. सातारा -श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई 

22. रायगड- कु . अदिती वरदा सुनिल तटकरे

23. लातूर -श्री. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

24. नंदूरबार- ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

25. सोलापूर -श्री. जयकुमार कमल भगवानराव गोरे

26. हिंगोली- श्री. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ

27. भंडारा -श्री. संजय सुशीला वामन सावकारे

28. छत्रपती संभाजीनगर - श्री. संजय शंकुतला पांडुरंग शिरसाट

29. धाराशिव- श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक 

30. बुलढाणा -श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

31. सिंधुदुर्ग -श्री. नितेश निलम नारायण राणे

32. आकोला -श्री. अकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

33. गोंदिया- श्री. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

कोल्हापुर -श्री. प्रकाश सुशीला अनंदराव अबिटकर
श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ (सह-पालकमंत्री)


35. गडचिरोली- ॲड. अशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल  (सह-पालकमंत्री)

36. वर्धा- डॉ. पंकज कांचन राजेश भोयर

37. परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर

Comments