पुन्हा होवू शकते लॉकडाऊन !! HMPV या विषाणूचा चीनमध्ये उद्रेक . अनेक नागरिक पडत आहेत मृत्युमुखी....
√ पूर्वी चीनमध्ये covid - 19 हा कोरोनाचा विषाणू आढळल्यानंतर आता तेथेच Human Metapneumovirus (HPMV ) या विषाणूने
थैमान घातलेले आहे .
√ सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) या विषाणूचा उद्रेक झालेला असून या विषाणूचे असंख्य रुग्ण आढळतात दिसत आहेत .
√ परंतु चिनने अद्याप जगाला याची माहिती दिलेली नाही किंवा अशा प्रकारचा विषाणू किती घातक आहे हे कळवलेले नाही .
√ हा विषाणू कोरोनासारखा तीव्र श्वसन संसर्गजन्य असून घातक आहे ,म्हणून आपण याची प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे .
√ आता आपण एचपीएमव्ही हा विषाणू काय आहे हे पाहू .
√ आपल्या भारत देशात ही या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसायला सुरू झालाय .
√ महाराष्ट्र राज्याच्या प्रवेशद्वारावर हा व्हायरस आलाय.
√ कर्नाटक राज्यातील बंगळुरु त एका तीन महिन्यांच्या मुलीला ह्यूमन मेटान्यूमो झालाय.
Human Metapneumovirus(HPMV)
१ ) Human Metapneumovirus(HPMV) हा विषाणू सर्वांत प्रथम नेदरलँड मध्ये २००१ मध्ये आढळला.
२) एचएमपीव्ही हा श्वसन विषाणू आहे
या मुळे श्वसन मार्गाच्या वरील भागात संसर्ग करतो
उदा . सर्दी होणे .
३) हंगामी संसर्गजन्य रोग असून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात उद्भवतो .
४) यावर अद्याप लस उपलब्ध नाही .
जास्त धोका कोणाला?
वयाने लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि कमी प्रतिकारशक्ती असनाऱ्या लोकांना या HMPV संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे.
लक्षणे कोणती आहेत?
•तीव्र खोकला,
•सततची सर्दी,
•जास्त ताप,
•घसा खवखवणे व जळजळ होणे,
•श्वास घेण्यास त्रास
• ब्राँकायटिस, न्यूमोनिया किंवा दम्याची लक्षणे
1) खोकणे किंवा शिंकणे,
2) हस्तोंदलन,
3) एखाद्याला रुग्णाला स्पर्श करणे,
4) रुग्णाच्या संपर्कात येणे,
5) दूषित अथवा घाणेरड्या पृष्ठभागांना स्पर्श करणे
6) तोंड, नाक किंवा डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे .
अशी घ्यावी काळजी?
➢ जेव्हा खोकला अथवा शिंका येतील तेव्हा आपण आपले तोंड आणि नाक रुमालाने किंवा टिश्यू पेपरने झाकणे आवश्यक आहे.
➢ साबण, पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुने आवश्यक आहे .
➢ ताप, खोकला किंवा शिका येत असतील तर सार्वजनिक ठिकाणाहून किवा गर्दीच्या ठिकाणाहून दूर रहा .
➢ भरपूर पाणी पिणे आवश्यक असते आणि पौष्ठीक अन्न खाणे गरजेचे आहे .
असे करू नका ?
➢ हस्तांदोलन करू नये.
➢ टिश्यू पेपर तसेच हात रुमालाचा पुनर्वापर करू नये.
➢ आजारी लोकांच्या संपर्कात जावू नये.
➢ डोळे , नाक, तोंड इत्यादी ला वारंवार स्पर्श करू नये.
➢ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
➢ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या औषध घेवू नये .( सेल्फ मेडीकेशन ).

Comments
Post a Comment