100% अनुदानावर सौर संचलित फवारणी यंत्र योजना

100% अनुदानावर सौर संचलित फवारणी पंप योजना - 2025


• सौर फवारणी यंत्र


सौर (सोलार) ऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र हे शेतकऱ्यासाठी आधुनिक शेती करण्यासाठी उपयुक्त असे साधनयंत्र आहे. 

पारंपरिक फवारणी यंत्रामध्ये जास्त वेळ आणि श्रम लागत असे.

  सौर फवारणी यंत्र हे मशीन अल्प वेळेत जास्त कार्यक्षमतेने फवारणी करू शकते. 

हे  सौर फवारणी यंत्र 15 ते 30 मिनिटांत एक एकर शेतात द्रव खत आणि कीटकनाशकांची फवारणी करू शकते.


या सोलार यंत्रामध्ये सौरऊर्जेच्या सहाय्याने मोटार कार्यरत होते. 

या सौर फवारणी यंत्र ची 18 लिटर क्षमतेची टाकी असून, ती सहज उचलून नेता येते. 

शिवाय, सौर फवारणी यंत्रामध्ये मजबूत नायलॉनचा पट्टा जोडलेला आहे यामुळे  त्याचा वापर अधिक सोपा ठरतो. 

पारंपरिक फवारणी यंत्रांपेक्षा सौर फवारणी यंत्र हे उपकरण सहापट अधिक वेगाने काम करू शकते, म्हणून वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. 

याशिवाय, इंधनाचा खर्च लागत नाही. शेती कमी खर्चिक बनते आणि पर्यावरनाचे संवर्धन व संरक्षण होते.

• 100% अनुदानावर सौर संचलित फवारणी पंप योजना

- या योजनेकरीता शेतकऱ्याकडे 7/12 व 8 अ असावा 

- शेतकरी अनु.जाती , अनु. जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.

- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील.

• अनुदान - 100%

• आवश्यक कागद पत्रे -

1. 7/12 व 8 अ

2. आधार कार्ड

3. बँक पास बुक

4. मोबाईल नंबर

5. स्वयं घोषणापत्र 

6. बँक पास बुक 

7. पूर्वसंमती पत्र 

8. जातीचा दाखला (S.C आणि S.T . साठी)


तूर पिकाचा शेंडा कधी खुडला पाहजे?....पहा लिंक 

https://informationsupport11.blogspot.com/2025/07/blog-post_9.html

Comments