भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण( fssai)

• भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरण( food safety and standard authority of India - fissai)

- भारतातील अन्नसुरक्षा व नियमन यांच्याशी संबंधित हा एकत्रित असा कायदा आहे.

- भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरण( food safety and standard authority of India - fssai)  या स्वायत्त संस्थेची स्थापना ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली झाली आहे.

- ही संस्था अन्नसुरक्षा नियंत्रण व देखरेख याद्वारे सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण व संवर्धन करते.

- Fssai ची स्थापना 5 ऑगस्ट ,2011 रोजी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम - 2005  (food  safety and standard act, 2005)  fssa या कायद्याअंतर्गत झाली.

• अन्नसुरक्षा व मानके अधिनियम - 2005 (food safety and standard act, 2005)  

- Fssa हा कायदा 2006 पासून अमलात आला.

- Fssa चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

- याची सहा प्रादेशिक कार्यालय 
दिल्ली ,मुंबई ,कलकत्ता ,चेन्नई ,गुवाहाटी आणि कोचीन येथे आहेत .
 
• Fssa ची मुख्य ध्येय तथा उद्दिष्टे -

- अन्नपदार्थासाठी विज्ञानावर आधारित मानके तयार करणे .

- अन्नाचे उत्पादन, साठवण ,वितरण, आयात व विक्री यांचे नियमन करणे .

- अन्नसुरक्षितता सुलभ करणे.

• अन्नसुरक्षा व मानके या कायद्याने जुन्या सर्व 7 कायद्यांचा एका छताखाली समावेश झालेला आहे.

1. अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा, 1954 व नियम 1955 

2. शेतीमाल उत्पादन श्रेणीकरण व विपणन कायदा1937 

3. भारतीय मानक संस्था अधिनियम, 1986

4.  वजन व मापन मानक कायदा, 1976 आवेस्टन बद केलेल्या वस्तूसाठी नियम, 1977 

5. पर्यावरण रक्षण कायदा ,1986 व नियम 1989 

6. निर्यात गुणवत्ता नियंत्रण व निरीक्षण कायदा 1963 

7. अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955

Comments