उंची वाढवण्यासाठी , वजन कमी करण्यासाठी तसेच कंबर दुखी , पोटाचे रोग, मधुमेही रुग्णांसाठी योग्य असे आसन व सामान्य व्यायामाचे प्रकार.
• वजन कमी करण्यासाठी व्यायाम प्रकार:-
आजच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक जन वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्न करताना दिसतो.
वाढलेले पोट अथवा वजन माणसाचे व्यक्तिमत्व खराब करते .
वाढलेले वजन माणवाच्या जीवणात विविध आजाराला आमंत्रण देते, म्हणून आज जो तो आपले वजन नियंत्रणात आणून निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.
हे निरोगी जीवन जगण्यासाठी सर्वप्रथम वाढलेले वजन कमी करावे लागेल.
मी आज तीन व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्यामुळे अनियंत्रित वाढलेले वजन कमी होईलच परंतु याचबरोबर हे व्यायाम प्रकार मानवाची उंची वाढवण्यासाठी, पोटाचे रोग, मधुमेह, कंबरदुखी इत्यादींवर सुद्धा रामबाण उपाय आहेत.
• 1. व्यायाम प्रकार - 1 पंजावर उंच उड्या मारणे .
क्रिया :-
- प्रथम ताठ सरळ रेषेत पंजावर उभे राहावे.
- नंतर हात खाली सरळ रेषेत ठेवावे.
- श्वास आत घेऊन फक्त पंजावर हळूहळू उड्या माराव्यात .
वेळ :-
पाच ते दहा मिनिटे .
2. व्यायाम प्रकार - 2 उड्या मारणे.
कृती:-
- पंजावर सरळ ताठ उभे राहावे .
- श्वास घेऊन उडी मारून हात खांद्याच्या रेषेत सरळ करावे.
- पायामध्ये दीड ते दोन फूट अंतर घ्यावे .
- नंतर श्वास सोडून पाय एकमेकास जोडावे व हात मांडीजवळ आणावेत .
वेळ :-
ही क्रिया न थांबता दोन ते पाच मिनिटे करावी
3. व्यायाम प्रकार -3 उड्या मारणे
क्रिया:-
- पंजावर सरळ ताठ उभे राहणे .
- हात कोपरात वाकवून छातीसमोर एकमेकांना स्पर्श करतील असे ठेवून श्वास घेऊन पंजावर हळूहळू उड्या माराव्यात .
• फायदे :-
या वर सांगितलेल्या तीन व्यायाम प्रकारामुळे अनियंत्रित वाढलेले वजन कमी होईल, उंची कमी असणाऱ्या मुलांची उंची वाढण्यासाठी मदत होईल, पोटाचे रोग कमी होतील, मधुमेह, कंबरदुखी इत्यादींवर सुद्धा मात करता येईल.
१ .संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते.
२. हाताचे ,पायाचे स्नायू बळकट होतात.
३. पोटाची अनावश्यक चरबी कमी होऊन शरीर सुडौल बनते .
४.उंची वाढते
Comments
Post a Comment