अवकाशवीर - शुभांशू शुक्ला .

• गगनवीर - शुभांशू शुक्ला




• ॲक्सिअम - 4 मोहिमेंतर्गत भारताचे अंतराळवीर शुभांशू        शुक्ला अंतराळात गेले होते .

• शुभांशु शुक्ला दि.26 जून 2025 ते दि.13 जुलै 2025 असे एकूण 18 दिवस अंतराळात राहिले .

• अंतराळात गेलेले शुभांशू शुक्ला हे दूसरे भारतीय आहेत . यापूर्वी चार दशकापूर्वी राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते . 

• राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर आहेत .

• शुभांशू शुक्ला हे अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय आहेत .

• दि .26 जून 2025 ते दि . 13 जुलै 2025 असे एकूण 18 दिवस अंतराळात शुभांशू शुक्ला यांनी शून्य गुरुत्वाकर्षणासंबंधी सात प्रयोग केले .

• त्यानी अंतराळातून भारताचे पंतप्रधान श्री . नरेंद मोदी यांच्या शी संवाद साधला होता .

• या मोहीमेत त्यांच्या सोबत अमेरिकेचे पेगी व्हाइटसन , पोलंडचे स्लावोझ  उझान्स्की , आणि हंगेरीचे टिबर कापू हे होते 

• अवकाशयान भारतीय वेळेनुसार दि . 14 जुलै , 2025 वार - सोमवार या दिवशी सायंकाळी  04:45 वाजता परतीच्या प्रवासाला निघाले असता ते दि . 15 जुलै , 2025 वार मंगळवार ला दिवशी दुपारी 03:01 वाजता पृथ्वीवर अमेरीकेतील कॅलीफोर्निया जवळ प्रशांत महासागरात ड्रॅगन नावाच्या अवकाश कुपी (स्पेस कॅप्सूल ) मधून उतरले .




• प्रशांत महासागरात उतरल्या नंतर ड्रॅगन स्पेस कॅप्सूल स्पेस एक्स या बोटीने नौके जवळ आणण्यात आली .

• शुभांशू शुक्ला सह चारही अंतराळवीरांना पृथ्वी वरचे वातावरण आणि गुरुत्वाकर्षणाशी समायोजन करून घेण्यासाठी सात दिवस ' पुनर्वसन केद्रांत ' राहावे लागणार आहे .

• इस्त्रोने या मोहिमेसाठी 550 कोटी रुपयाचा खर्च केला .

• या यशस्वी कामगिरी बद्दल शुभांशू शुक्ला यांचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मू , पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी यांनी स्वागत
आणि अभिनंदन केले आहे . तसेच भारतभरात आनंदाचे वातावरण आहे .


Comments