प्रसूती काळात मातांची व नवजात बालकांची घ्यावयाची काळजी



• गरोदरपणात घ्यावयाची काळजी •

1. आरोग्य केंद्रात जाणे -
      
  •  गरोदरपण नक्की झाल्यानंतर आरोग्य केंद्रात जाणे आवश्यक असते. यामुळे बाळंतपणात धोका होत नाही व सुदृढ बाळ जन्माला येते.

•  गरोदरपणातील अडचणी वेळीच समजतात.
रक्त कमी असल्यास रक्त वाढीच्या गोळ्या मोफत मिळतात.

• रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी करून बाळंतपणात संभाव्य धोक्याची सूचना मिळते व उपचार सुरू करता येतात.

• पायावर सूज येवू शकते. हे बाळ व मातेला अपायकारक असते .म्हणून मीठ कमी खाण्याचा डॉक्टर सल्ला देवू शकतात.

• धनुर्वात प्रतिबंधक लस टोचल्यास मातेला व बाळाचा धनुर्वाताचा धोका टळतो.

• बाळाची वाढ योग्य रीतीने होत आहे की नाही हे समजते .

• बाळंतपणासाठी मातेची मानसिक तयारी करता येते.

• बाळंतपणासाठी अनुभवी दाई, डॉक्टर, परिचारिका यांची मदत मिळविता येते.

2. आहार विषयक काळजी - 

- गरोदर मातेने आहार जागृतीने घ्यावा. 
- वाढत्या गर्भाच्या पोषणासाठी पोषक आहार असावा.
- कडधान्य, सुकामेवा, शेंगदाणे खावेत .
- क्षार व जीवनसत्त्वे आहारातून मिळावीत.
- आहारात गाजर, पपई ,पेरू, आंबा, दूध ,ताक ,दही घ्यावे.
- पालक , घोळ ,मेथी ,चवळी शेवगा इत्यादी खावे.     
-डॉक्टरांना विचारून आणली मांस,अंडी, मासे खावेत. 

3. गरोदरपणापूर्वीची धोके -
 
- पूर्वीच्या बाळंतपणानंतर दोन वर्षाआधी गरोदरपण .
- 18 वर्षाखालील व 35 वर्षानंतर चे बाळंतपण 
- बाळंतपणाची पाचवी अथवा त्यानंतरची खेप .
- आधीची अवघड बाळंतपणे.
- कमी दिवसाचे मूल उमजणे .
- गर्भपाताचा परत परत अनुभव .
- उपजतच बाळाचा मृत्यू परत परत होणे.
-  गरोदरपणापूर्वी 36 किलो पेक्षा कमी वजन असणे व उंची 145 सेंटीमीटर पर्यंत कमी असणे .

4. गरोदरपणातील धोके -

- सहाव्या महिन्यात 6 किलो पेक्षा अधिक वजन न वाढणे.

 - शरीरात रक्त कमी होणे .

- हात ,पाय व चेहऱ्यावर सूज येणे .

- योनीतून रक्त येणे.

- तीव्र डोकेदुखी.

- उलट्या.

• बाळाची काळजी कशी घ्यावी • 

दोन मुलानंतर पाळणा थांबवणे गरजेचे आहे. शासनाने तसा कायदा ही केलेला आहे 

प्रसूती वेळी आईच्या दुधाचा रंग पिवळसर झालेला असतो ज्याला कोलोस्ट्रम  असे म्हणतात. हे दूध नवजात बालकांना पोषणासाठी खूप आवश्यक असते.यात सर्व पोषणाचे घटक असतात.

दुधातील पाणी बाळाला पुरेसे होत नाही म्हणून बाळाला एक दोन वेळा उकळून थंड केलेले पाणी पाजावे .बाळाला जुलाब होतात ,शरीरातील पाणी कमी होते .त्यासाठी भरपूर पाणी पाजावे 

मुल तीन-चार महिन्याचे झाले तेव्हा भाताची पेष्ट ,केळांचा गर बिस्किट पाण्यात कुस्करून घालावे 

मुल 6 महिन्याचे झाले तेव्हा वरनाचे पाणी, रव्याची खीर द्यावी थोडे थोडे पातळ पदार्थ पचतात. नंतर प्रमाण हळूहळू वाढवावे. 

मुल एक वर्षाचे झाले तेव्हा भात, वरण ,चपाती, पालेभाजी जेवणात देत जावी 

मुलांच्या मेंदूची वाढ पहिल्या 5 वर्षांमध्ये पूर्ण होते त्यासाठी त्यांना प्रथिने पुरेशी दिली जावीत.

भारतामध्ये बऱ्याच मुलांना अ- जीवनसत्व कमी पडते . रातआंधळेपणा, डोळ्यातील दोष असतात .आरोग्य केंद्रात
 अ- जीवनसत्व मोफत देतात .अंडी, दूध ,फळे, तूप, पालेभाज्या बालकास देत राहावे .

 • बालकांचे लसीकरण

1.तीन महिने ते नऊ महिने  - देवी प्रतिबंधक ,बीसीजी , त्रिगुणी
  लस ,पोलिओ प्रतिबंधक लस 

2  नऊ ते बारा महिने -गोवर प्रतिबंधक लस 

3. 15 महिने ते 24 महिने -त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक         लस बूस्टर 

4. पाच वर्ष ते सहा वर्ष - त्रिगुणी लस   बूस्टर डोस आणि विषमज्वर प्रतिबंधक लस एक ते दोन महिन्याच्या अंतराने दोन डोस 

5. दहा वर्ष - धनुर्वात विषमज्वर प्रतिबंधक लस 

6. पंधरा वर्षे - धनुर्वात लस

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना पहा लिंक https://informationsupport11.blogspot.com/2024/09/2.html

Comments