कढीपत्ता सेवनाचे आरोग्यविषयक फायदे.

• कढीपत्ता •
• कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक असून दररोज वापरला जाणारा  घटक आहे .

• आयुर्वेदात कढीपत्त्याचा महिमा सांगितला गेलाआहे. 

• स्वयंपाकघरात विविध प्रकारचे पदार्थ बनवताना कढीपत्ता आवर्जून वापरला जातो कारण तो
मसाल्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे. 

उदाहरणार्थ -  पोहे, कढी, विविध भाज्या, चटणी , दाळ सांबर इत्यादी.

• या कढीपत्त्याची झाडे घराच्या अंगणात, परसबागेत, शेतातील बांधावर, घराजवळच्या किंवा शेताजवळच्या रिकाम्या जागेत लावली जातात तसेच काही शेतकरी याची पाने बाजारात सुद्धा विकतात.

• कडीपत्त्याची पावडर करून सुद्धा आता विकली जावू लागली आहे. यातून चांगली रोजगार निर्मिती केली जात आहे.

• कढीपत्त्यामुळे पदार्थाची चव सुद्धा विशेष असते. परंतु कढीपत्ता खाताना कोणी दिसत नाही, कढीपत्त्याला अगोदर अलगत बाजूला करून पदार्थावर ताव मारला जातो. परंतु हे योग्य नाही. 

• कढीपत्ता आरोग्यवर्धक आहे.

• कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम , मिनरल,जीवनसत्त्वे ज ए-बी-सी-ई ,  फायबर, प्रथिने, फॉस्फरस इत्यादी घटक असतात.

•  कढीपत्त्यात वेदना शामक अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीडायबेटिक घटक सुद्धा असतात.

• कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक हे घटक  आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. सर्दी , खोकला आणि विषाणूजन्य ताप  अशाप्रकरच्या संसर्गापासून संरक्षण करतात. 

• कढीपत्त्यामध्ये काही नैसर्गिक गुण असल्यामुळे तो माणसांना वजन  कमी करण्यासाठी मदत करतो.
कढीपत्त्याची कच्ची पाने खाल्ली किंवा त्याच रस सेवन केल्यास किंवा त्याची पावडर बनवून आहारात घेतल्यास तो डिटॉक्स ड्रिंक म्हणून कार्य करतो.
शरीराला आतमध्ये स्वच्छ करतो. चरबी जाळतो.
वाईट कॉलेस्ट्रॉल ( bad fats) कमी करून पचनक्रिया सुधारतो.

• दररोज कढीपत्त्याचे सेवन केल्यास नक्कीच सकारात्मक ( positive) परिणाम दिसतात.
 कढीपत्ता उकळवून पिल्यास उलट्या, जुलाब आणि मळमळ अशा समस्यांपासून सुटकारा मिळतो.

 • कढीपत्त्यात  लोह हा घटक असल्याने  ऍनिमियावर गुणकारी आहे. यात फॉलिक ॲसिड  असल्याने  रक्तातील ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारली जाते.

• सकाळी उपासी पोटी कढीपत्ता उकळून पिणे मधुमेह  रुग्णांसाठी  फायदेशीर आहे, ते रक्तातील साखर स्तर  नियंत्रित करतात. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Comments