ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक लाभ देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना

•  मुख्यमंत्री वयोश्री योजना • 


• सन 2011 च्या भारताच्या जनगणनेच्या आधारे महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे . यापैकी 65 वयाची व त्यापुढील लोकसंख्या 1.25 ते 1.50 कोटी आहे .या जेष्ठ नागरिकांना उतारवयात विविध व्याधींना सामोरे जावे लागते . त्यांना वृद्धोपकवळ सुसह्य वाटावा याकरीता त्यांना त्यांच्या व्याधीवर उपायोजना करण्याकरीता विविध उपचार , उपकरणे , प्रशिक्षणे इत्यादी  घेता यावीत म्हणून "मुख्यमंत्री वयोश्री योजना " सुरू करण्यात आली आहे . 

• निर्णय -

याचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 6 फेब्रुवारी 2024 ला घेण्यात आला.

• योजनेचे नाव - मुख्यमंत्री वयोश्री योजना • 

•  पात्रता - 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक (दि . 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण असावीत . )

• उद्देश -
1. वयोमानासार येणाऱ्या समस्या , व्याधी  , अंपगत्व , अशक्तपणा  इत्यादी वर उपाय योजना करता याव्यात .

2. वयोपरत्वे येणाऱ्या व्याधीवर उपाययोजना म्हणून विविध साधने , खरेदी करता यावीत .

3 .मानसिक स्वास्थ  आबाधित अथवा  व्यवस्थित ठेवण्यासाठी मानसोपचार , योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे प्रशिक्षण घेता यावे .

• लाभ -  
पात्र जेष्ठ नागरिकांना प्रतिवर्ष  3000 रुपये  एकरकमी  त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण प्रणाली (DBT) द्वारे जमा होतील .

• आवश्यक असणारी कागदपत्रे :
1. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड .
2 . राष्ट्रीयकृत बँक पासबुक सत्यप्रत .
3. पासपोर्ट  फोटो - 2 
4. स्वंयंघोषणा पत्र
5. शासनाने ओळखपत्र पडताळणी करीता विहित केलेली इतर कागदपत्रे .

• निकष -
1. दि . 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण असावीत .

2. आधार कार्ड असावे नसेल तर आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा अथवा अन्य अधिकृत ओळखपत्र असावे .

3. लाभार्थ्यांचे एकूण कटूंबाचे उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे .असे स्वंय घोषणा पत्र द्यावे .

4. जिल्हयात एकूण लाभार्थ्यांच्या 30% महिला लाभार्थी असतील .

• नियंत्रण -
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे केले जाईल. 

• मूल्यमापण -
 अंमलबजावनीच्या एक वर्षानांतर आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्यामार्फत केले जाईल.
 
• योजनेचे स्वरूप- 
1. पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या आजारपण व व्याधिनुसार  खालील साधने खरेदी करता येतील.
उदा:-
•चष्मा,
•श्रवणयंत्र,
•ट्रायपॉड, 
•स्टीक ,
•व्हील चेअर ,
•फोल्डिंग वॉकर ,
•कमोड खुर्ची ,
•नि-ब्रेस ,
•लंबर बेल्ट ,
•सर्वाइकल कॉलर इ.

2. केंद्रशासन कार्मिक विभागात नोंदणीकृत असलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडे  नोंदणी केलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वस्वाथ कें द्र, मनशक्ती कें द्र किंवा प्रशिक्षण  केंद्रात सहभाग घेता येईल.

• अन्य माहिती साठी पहा लिंक...




Comments