बन्नी (गुजरात) येथे होणार चित्तांचे पुनर्वसन ....
भारतीय चित्ता नामशेष झाल्याने आफ्रिकेतील चित्ता भारतात आणला जाणार आहे. आफ्रिकेतील चित्ता गौताळ प्रदेशात नैसर्गिक अधिवास चांगल्या प्रकारे करतो.
• भारतामध्ये आफ्रिकन चित्त्याच्या पुनर्वसनासाठी एकूण दहा संभाव्य ठिकाणे सूचीबद्ध केली गेली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत.
1) छत्तीसगड राज्य - घाशीराम राष्ट्रीय उद्यान
2) गुजरात राज्य - बन्नी गवताळ प्रदेश
3) मध्य प्रदेश राज्य -
दुब्बरी वन्यजीव अभयारण्य
संजय राष्ट्रीय उद्यान ,(म.प्र ) बगदर अभयारण्य
नौवरदेही वन्यजीव अभयारण्य जोआता विरांगणा दुर्गावती वाघ्रप्रकल्प
4) राजस्थान राज्य- कुनो वाळवंट राष्ट्रीय उद्यान
शाहगड गवताळ प्रदेश
5) उत्तर प्रदेश राज्य- कौमुर
वरील 5 राज्यातील 10 संभाव्य ठिकाणे सूचीबद्ध केली गेली होती. या 10 ठिकाणांपैकी गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी हा गवताळ प्रदेश निवडला गेला आहे.
गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी हा गवताळ प्रदेश हा भारतीय उपखंडातील तथा भारतातील सर्वात मोठ्या गवताळ प्रदेशापैकी एक आहे .
आफ्रिकन चित्यांना बन्नी या गवताळ प्रदेशात आणण्यासाठी राष्ट्रीय वाघ्रा संवर्धन प्राधिकरण आणि चित्ता प्रकल्प सुकाणू समितीच्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे.
• आफ्रिकन चित्त्यांना गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी या गवताळ प्रदेशामध्ये आणण्यापूर्वी काही गोष्टी अगोदरच तयार ठेवण्यात आलेल्या आहे जसे की,
1.चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र स्थापन केले आहे.
2.शिकारीसाठी चितळ आणि सांबरांची संख्येत वाढ केली आहे .
3. 600 हेक्टर क्षेत्राचे कुंपण बनविण्यात आले आहे जनेकरून चित्त्याच्या अधिवासात इतर मोठे मांसाहारी प्राणी येणार नाहीत .
4. सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
5. वैद्यकीय केंद्र स्थापन करून पशुवैद्यकांना कुनो या राष्ट्रीय उद्यानात प्रशिक्षित करण्यात आले आहे.
मटकी खा , हृदयरोग टाळा..
Comments
Post a Comment