' मटकी ' - एक आरोग्यदायी कडधान्य.
आहारशास्त्रानुसार आहारात कडधान्यांना खूपच मोलाचे स्थान आहे. या कडधान्यांमध्ये हरभरा , मूग,
मसूर ,उडीद ,तूर ,राजमा ,मटकी ,चवळी ,वाटाणे , इत्यादी अशा प्रकारच्या डाळींचा समावेश होतो.
यापैकी मटकी या कडधान्याची माहिती पाहणार आहोत.
• मटकी •
Class - कडधान्य (Pulses / Legumes)
English name - Moth Bean
Classical name- Vigna aconitifolia
आकार - मटकीची शेंग ही लहान आकाराची असते.
रंग - मटकीची दाने तपकिरी रंगाची असतात.
समाविष्ट घटक - मटकी मध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे यासह मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम ही अत्यंत महत्त्वाची खनिजे असतात.
आढळ - कोरड्या हवामानात आणि कोरडवाहू शेतीत सुद्धा मटकीचे पीक घेतले जाते.
उपयुक्तता - शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम पर्याय म्हणून मटकीकडे पहिले जाते.
मटकीचे आरोग्य विषयक फायदे -
• मटकी हे कडधान्य रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून रक्त सुधारून हृदयाच्या आरोग्याला साहाय्य करते.
• रक्ताभिसरण आणि रक्तदाब यावर नियंत्रण ठेवण्यास ही मटकी मदत करते.
• धमण्या स्वच्छ व निरोगी ठेवून हृदयाचा धोका कमी करण्यास मटकी मदत करते.
• मटकी या कडधान्यात फायबर, मॅग्नेशियम याशिवाय उच्च दर्जाचे प्रथिने, पोटॅशियम आणि फोलेट असल्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल सद्धा कमी करण्याची क्षमता मटकी ठेवते.
• मटकीतील पोटॅशियमची रक्तदाब व्यवस्थित करतो, यामुळे हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी रोगावर सकारात्मक लाभ मिळतो.
• मटकी मधील एंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे ताण - तणाव तसेच जळजळ कमी करण्यास साहाय्य मिळते.
• मटकी रात्रभर भिजवल्याने व नीट शिजवल्याने पचनक्रिया सुधारण्यास साहाय्य होते .
• मोड आलेली मटकी खाल्ली तर तिचे अधिक चांगले लाभ मिळतात .
मटकी वापरून बनवले जाणारे खाद्य पदार्थ -
1. मटकी उसळ
2. मिसळ पाव
3. मटकीची भाजी
4. अंकुरित मटकी सॅलड
अफ्रिकन चित्ता भारतात....पहा लिंक
Comments
Post a Comment