शाळा व्यवस्थापन समिती


* बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या कलम 21 नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली जाते .

कायम विनाअनुदानित शाळे व्यतिरिक्त प्रत्येक शाळेत नवीन विद्या विषयक वर्ष सुरू झाल्याच्या दिनांक पासून तीन महिन्याच्या आत शाळेच्या क्षेत्र किंवा हद्दीमध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल व ती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठीत करण्यात येईल.
*रचना 
1) शाळा व्यवस्थापन समितीमध्ये 75 % सदस्य हे बालकांचे माता, पिता किंवा पालक यांच्यापैकी असतील .

2) शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण सदस्यांपैकी 50% सदस्य हे महिला असतील .

3) दोन विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधित्व दिले जाईल, त्यापैकी एक मुलगी असेल या स्वीकृत सदस्यांना मात्र मतदान करण्याचा अधिकार नसेल. 

4) दुर्बल- वंचित गटातील बालकांच्या माता व पिता यांना तसेच वेगवेगळ्या स्तरावरील उदाहरणार्थ उच्च मध्यम व कमी नैपुण्य दाखविणाऱ्या बालकांच्या माता व पिता यांना सुद्धा पुरेशे प्रतिनिधित्व देण्यात येईल .

5) शाळा व्यवस्थापन समितीमध्ये उरलेले 25 % सदस्य हे स्थानिक प्राधिकरणाने निवडून आलेले प्रतिनिधी, व्यवस्थापनाचे सदस्य ,मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक ,शिक्षक ,शिक्षण तज्ञ किंवा बालविकास तज्ञ यांच्या मधून निवडले जातील .

6)शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा शासन किंवा स्थानिक प्राधिकरण यांनी चालल्या चालवलेल्या शाळांच्या बाबतीत बालकांचे माता व पिता यांच्या मधून निवडण्यात येईल .

7) शाळेचा मुख्याध्यापक किंवा ज्या शाळेत मुख्याध्यापक नसेल तिथे शाळेचा वरिष्ठ शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचा पदसिद्ध सदस्य- सचिव असेल .

8) शाळा व्यवस्थापन समितीची बैठक महिन्यातून किमान एकदा घेण्यात येईल.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना देईल तुमच्या पाल्याला अपघाताचा दवाखाना खर्च पहा माहिती लिंक मध्ये 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शिक्षणाचा अधिकार कायदा अभ्यासा पुढील लिंक द्वारे

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पहा लिंक

Comments